IRCTC कडे ट्विटमधून तक्रार करणंच पडलं महागात, महिलेच्या अकाऊंटमधून कट झाले ६४ हजार रुपये; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:47 PM2023-01-03T18:47:44+5:302023-01-03T18:49:18+5:30

इंटरनेट आणि सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. या व्यासपीठावरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकाचवेळी पोहोचता येतं.

woman tweets to irctc about rac ticket falls in rs 64k fraud cyber criminal | IRCTC कडे ट्विटमधून तक्रार करणंच पडलं महागात, महिलेच्या अकाऊंटमधून कट झाले ६४ हजार रुपये; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IRCTC कडे ट्विटमधून तक्रार करणंच पडलं महागात, महिलेच्या अकाऊंटमधून कट झाले ६४ हजार रुपये; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

googlenewsNext

नवी दिल्ली-

इंटरनेट आणि सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. या व्यासपीठावरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकाचवेळी पोहोचता येतं. इतकंच नव्हे, तर आपल्या अडचणी देखील पब्लिक डोमेनवर सहजपणे व्यक्त करू शकतो. सोशल मीडियाचा फायदा फक्त लोकांना तर झालाच, पण स्कॅमर्सनंही वाढले आहेत. 

नेटिझन्सनं एक चूक केली की हॅकर्सना त्यांचं शिकार सापडतो. असंच काहीसा प्रकार मुंबईतील एका महिलेसोबत घडला आहे. एका चुकीमुळे महिलेच्या खात्यातून स्कॅमरनं ६४ हजार रुपये लंपास केले आहेत. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित महिलेला आपलं RAC तिकीट अपडेट करायचं होतं आणि यासाठी तिनं ट्विटरवर IRCTC ला टॅग करत एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये तिनं आपला मोबाइलनंबर आणि तिकीटाचे डिटेल्स शेअर केले. एमएन मिणा हिनं IRCTC च्या वेबसाइटवरुन १४ जानेवारीसाठी तीन तिकीट बूक केल्या होत्या. पण त्यांच्या तिकीट RAC झाल्या. त्यांनी आपल्या तिकीटाची माहिती मिळवण्यासाठी स्वत:चा नंबर आणि ट्रेन तिकीट IRCTC मेन्शन करत ट्विट केलं. हिच चूक महिलेला महागात पडली आणि स्कॅमरनं याचा गैरफायदा घेतला. 

२ रुपयांच्या पेमेंटसाठी कट झाले ६४ हजार रुपये
ट्विट केल्यानंतर काही वेळानं एमएन मिणा यांना स्कॅमर्सकडून फोनकॉल आला. स्कॅमर्सनं स्वत:ला IRCTC चे कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगितलं. तिकीट बुकींगसाठी मदत करण्यासाठी फोन केल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर स्कॅमरनं महिलेला फोनवर एक लिंक पाठवली आणि त्यात सर्व डिटेल्स भरण्यास सांगितलं. त्यानंतर स्कॅमरनं संबंधित लिंकवर दोन रुपयांचं एक ट्रान्झाक्शन करायला लावलं. महिलेनं अगदी तसंच केलं. महिलेनं संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिच्या अकाऊंटमधून ६४,०११ रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. 

महिलेला जेव्हा आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा ती पोलिसात केली. विलेपार्ले पोलीस ठाण्यात तिनं तक्रार दाखल केली आणि प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेनं तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ज्या नंबरवरुन फोन आला होता त्यावर पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण नंबर स्विच ऑफ असल्याचं आढळून आलं.

Web Title: woman tweets to irctc about rac ticket falls in rs 64k fraud cyber criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.