ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:37 PM2020-08-31T12:37:15+5:302020-08-31T12:41:51+5:30

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून याच दरम्यान काही अजब घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये घडली आहे.

woman used husbands passport to take lover australia | ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...

ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...

Next

पीलीभीत - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून याच दरम्यान काही अजब घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये घडली आहे. पतीच्या पासपोर्टवर एक महिला आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन ऑस्ट्रेलियाला गेली मात्र लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून राहिली. यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती घरच्यांसोबत सर्वांनाच समजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक 36 वर्षीय महिला 6 जानेवारीला पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेली होती. मार्चमध्ये त्यांना परत यायचं होतं. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे ते 24 ऑगस्टला परतले आहेत. महिला भारतात परत आल्यावर तिच्या पतीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध आहेत. या दोघांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्याच्या नावाने पासपोर्ट तयार केल्याचं पतीने पोलिसांना सांगितलं आहे.

पतीने केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक जय प्रकाश यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. पतीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांपासून महिलेचा पती मुंबईत काम करतो. पत्नीला भेटण्यासाठी तो कधी कधी आपल्या घरी जातो. महिला पीलीभीतमध्ये फार्महाऊस आणि शेतीचे काम पाहते.

महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी तो घरी परतला होता तेव्हा पत्नी घरी नसल्याचं समजलं. संदीपच्या कुटुंबीयांनी ते दोघेही ऑस्ट्रेलियाला गेल्याची माहिती दिली. आपल्या नावाने पासपोर्ट तयार करून विदेश दौऱ्यावर गेला नाही ना, हे जाणून घेण्यासाठी पतीने बरेलीत पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यावेळी 2 फेब्रुवारी 2019 रोजी महिलेने पतीच्या नावाने पासपोर्ट तयार केल्याची माहिती मिळाली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"...तर 2024 ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल"

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

धक्कादायक! कोरोनाग्रस्त नेत्याने रुग्णालयातून काढला पळ, पुलावरुन उडी मारुन केली आत्महत्या

CoronaVirus News : कोरोनावर कधी नियंत्रण मिळवता येणार?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

भयंकर! 'त्या' हत्याकांडाचं गूढ उकललं; मुलीनेच केली होती आई, भावाची हत्या अन्...

Web Title: woman used husbands passport to take lover australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.