"नवरा नको, बॉयफ्रेंड हवा..."; 2 मुलांची आई पडली भाच्याच्या प्रेमात; पतीला ओळखण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 04:38 PM2023-03-25T16:38:32+5:302023-03-25T16:39:19+5:30

मावशी भाच्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीला ओळखण्यास नकार दिला.

woman wants to marry sister son in muzaffarpur bihar | "नवरा नको, बॉयफ्रेंड हवा..."; 2 मुलांची आई पडली भाच्याच्या प्रेमात; पतीला ओळखण्यास नकार

"नवरा नको, बॉयफ्रेंड हवा..."; 2 मुलांची आई पडली भाच्याच्या प्रेमात; पतीला ओळखण्यास नकार

googlenewsNext

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक घटना बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. जिथे एक विवाहित महिला आपल्या मोठ्या बहिणीच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. मावशी भाच्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीला ओळखण्यास नकार दिला. तिला मावशी म्हणणार्‍या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी आता ती अडून बसली आहे. 

विवाहित महिला कांती पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे सासर कटरा गावात आहे. महिलेला दोन मुलेही आहेत. बहिणीच्या सासरच्या घरी काही दिवस राहिल्यानंतर ती बहिणीच्या मोठ्या मुलाच्या जवळ आली. दोघांमधील संबंध वाढू लागले. काही दिवसांनी तो तरुण आपल्या मावशीला फिरायला घेऊन गेला. तेथून परतल्यावर मोठ्या बहिणीला संशय आला. कसून चौकशी केल्यावर विवाहितेने बहिणीसमोरच मुलासोबतचे प्रेमसंबंध मान्य केले.

सामाजिक स्तरावर हे प्रकरण न सुटल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे बोलले जात आहे. विवाहितेने पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा केला. सर्व नातेवाईक समजावत राहिले. पण ती कोणाचंही ऐकायला तयार नाही. तिने पोलिसांसमोर पतीला ओळखण्यासही नकार दिला. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

कुटुंबातील सदस्य अजूनही विवाहित महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती प्रत्येक संकटाला तोंड द्यायला तयार असल्याचं त्यांना सांगत आहे. तसेच प्रियकराची साथ सोडणार नाही असंही म्हणत आहे. तक्रार आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या या घटनेची गावात जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: woman wants to marry sister son in muzaffarpur bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.