बापरे बाप! कोणता साप चावला? डॉक्टरांनी प्रश्न विचारताच नातेवाईकांनी रुग्णालयात उघडली गोणी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 10:57 AM2022-10-13T10:57:46+5:302022-10-13T10:59:42+5:30
महिलेला कोणता साप चावला आहे, असा प्रश्न डॉक्टरांनी विचारताच महिलेच्या नातेवाईकांनी गोणी उघडली आणि डॉक्टरांना साप दाखवला.
उत्तर प्रदेशच्या ओरैयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला साप चावला. तिला घेऊन तिचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. महिलेला कोणता साप चावला आहे, असा प्रश्न डॉक्टरांनी विचारताच महिलेच्या नातेवाईकांनी गोणी उघडली आणि डॉक्टरांना साप दाखवला. हा प्रकार पाहून डॉक्टर हैराण झाले. त्यांनी नातेवाईकांना सापाला सोडून देण्यास सांगितलं आणि महिलेवर उपचार सुरू केले. दरम्यान सापाला पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ओरैयामधील दिबियापूरमध्ये ही घटना घडली आहे. रात्रीच्या वेळेस राणा नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पिंकी देवी यांना त्यांच्या घराबाहेर साप चावला. कुटुंबियांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. महिलेला कोणता साप चावला, अशी विचारणा डॉक्टरांनी केली. त्यावेळी नातेवाईकांनी सोबत आणलेली गोणी उघडली. त्यामध्ये एक साप होता. नातेवाईकांनी डॉक्टरांना साप दाखवला. हाच साप चावला होता, असं उत्तर नातेवाईकांनी दिलं.
गोणीत साप असल्याचं पाहून डॉक्टरांना मोठा धक्काच बसला. रुग्णालयातील अनेकांनी साप पाहायला गर्दी केली. डॉक्टरांनी नातेवाईकांना साप बाहेर सोडून येण्यास सांगितलं. महिलेवर उपचार सुरू करण्यात आले. आता तिची प्रकृती चांगली आहे. मात्र अजूनही त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तिला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
17 सप्टेंबरला याआधी सोनभद्रमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना रात्री साप चावला. त्यावेळी तिघेजण झोपले होते. सर्पदंशामुळे आई आणि लेकीचा मृत्यू झाला. तर मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी सापाला काठीने मारहाण केली. यात सापाचा मृत्यू झाला. चोपन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गौरव नगरमध्ये हा प्रकार घडला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.