विधवेला लग्नाची परवानगी नाकारत जात पंचायतीने जिवंत जाळले

By admin | Published: May 28, 2015 05:31 PM2015-05-28T17:31:10+5:302015-05-28T18:08:15+5:30

एका ३५ वर्षीय विधवा महिलेचे तिच्या विधूर सास-यांशी संबंध असल्याची बातमी कळताच त्या महिलेला जात पंचायतीने जिवंत जाळले.

The woman was denied the marriage permission of the widow by the Panchayat | विधवेला लग्नाची परवानगी नाकारत जात पंचायतीने जिवंत जाळले

विधवेला लग्नाची परवानगी नाकारत जात पंचायतीने जिवंत जाळले

Next
>ऑनलाइन लोकमत
 
पाटणा, दि. २८ - एका ३५ वर्षीय विधवा महिलेचे तिच्या विधूर सास-यांशी संबंध असल्याची बातमी कळताच त्या महिलेला जात पंचायतीने जिवंत जाळले.
सुपौल जिल्ह्यातील पिपरा गावातील रहिवासी असणारी महिला व तिचे चुलत सासरे यांच्यातील संबंधांची माहिती विधवा महिलेच्या सासूला मिळताच तीने या प्रकरणाची माहिती पंचायतीला दिली. या प्रकरणी या विधवा महिला व तीचे चुलत विधूर सासरे घनशी यांना लग्न करायचे होते परंतु, जात पंचायतीला हा निर्णय मान्य नसल्याने एका कागदावर या महिलेशी झालेल्या घटनेबाबत गावातील कोणतीही व्यक्ती जबाबदार नाही या आशयाच्या मजकूरावर सही घेऊन तिला अंदाजे शंभर जणांसमोर जिवंत जाळले. 
या प्रकरणी सुपौलच्या पोलीस अधीक्षकांना विचारले असता त्यांनी या घटनेची अद्याप माहिती नसल्याचे सांगितले आहे. तर, येथील ठाणे अंमलदार चंदन कुमार यांनी हत्येची तक्रार दाखल कुणीही केली नसल्याने आत्महत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे असे सांगितले. या विधवा महिलेला तीन मुलं असून घनशी या विधूर चुलत सास-यासही तीन मुले असून त्यांची पत्नी तीन वर्षापूर्वी वारली होती. 
 

Web Title: The woman was denied the marriage permission of the widow by the Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.