सौदीत विकण्यात आलेल्या महिलेची सुटका
By admin | Published: April 27, 2017 10:30 PM2017-04-27T22:30:00+5:302017-04-27T22:44:31+5:30
सौदी अरेबियात विकण्यात आलेल्या महिलेची सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - सौदी अरेबियात विकण्यात आलेल्या महिलेची सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी हैदराबादमधील सलमा बेगम या महिलेची एजंटांकडून फसवणूक करून तिला सौदी अरेबियात विकण्यात आल्याची धक्कादायक बातमी मीडियात झळकली होती. या बातमीची दखल घेत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अवघ्या 72 तासात सलमा बेगमची सुटका केली असून ती लवकरच भारतात दाखल होणार आहे.
यासंदर्भात सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन सांगितले की, सलमा बेगमची सुटका करण्यात आली असून ती 28 एप्रिलला सकाळी सव्वा चारच्या सुमारास G9406 या विमानाने मुंबईत पोहचणार आहे. तसेच, सुषमा स्वराज यांनी सलमा बेगमची अवघ्या 72 तासांत सुटका केल्याबद्दल रियाधमधील भारतीय दूतावासातील अधिका-यांची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, 39 वर्षीय सलमा बेगमला दोन एजंट्सनी 21 जानेवारीला घरगुती कामाच्या व्हिसावर सौदी अरेबियाला पाठवले होते. त्यानंतर सलमा हिने स्वतःच्या मुलीला मेसेज करून सांगितले की, मला तीन लाख रुपयांना विकण्यात असून माझ्यावर अमानुष अत्याचार केले जात आहेत. यावर सलमाच्या मुलीने तेलंगणा सरकार आणि केंद्र सरकारकडे आईला सुखरूप सोडवून भारतात आणण्यासाठी मदत मागितली होती.
Indian national Salma Begum has been rescued. She is reaching Mumbai by flight G9406 at 04.15 am on 28 April 2017. https://t.co/f4lfiu2JYg
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 27, 2017
I appreciate the efforts of @IndianEmbRiyadh for resolving this in just 72 hours. /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 27, 2017