श्रीरामनगरमध्ये महिलेची सोनसाखळी खेचली

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:17+5:302015-08-17T00:27:59+5:30

नाशिक : भावाच्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे़

The woman's son-in-law pulled out in Shriramnagar | श्रीरामनगरमध्ये महिलेची सोनसाखळी खेचली

श्रीरामनगरमध्ये महिलेची सोनसाखळी खेचली

Next

नाशिक : भावाच्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे़
आडगाव नाका परिसरातील श्रीरामनगरमध्ये राहणारे दीपक विनोद दवे यांची आई शाळेत गेलेल्या लहान मुलीला घेण्यासाठी हिरावाडी रोडवरील जनकल्याण बँकेसमोर गेल्या होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली़
या प्रकरणी दवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: The woman's son-in-law pulled out in Shriramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.