महिलाच कापतायेत स्वतःची वेणी? पोलिसांचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 08:51 AM2017-08-04T08:51:44+5:302017-08-04T08:55:17+5:30

सध्या सुरू असलेल्या तपासातून पोलिसांनी दोन मुद्द्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.

Women bend their own bounty? Police suspects | महिलाच कापतायेत स्वतःची वेणी? पोलिसांचा संशय

महिलाच कापतायेत स्वतःची वेणी? पोलिसांचा संशय

Next
ठळक मुद्देदिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांची वेळी कापण्याच्या घटना घडत आहेत. सध्या सुरू असलेल्या तपासातून पोलिसांनी दोन मुद्द्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.एकतर ती महिलाच स्वतःची वेळी कापत असावी किंवा तिच्या घरातील सदस्य वेणी कापण्याचा हा प्रकार करत असावे, असा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली, दि. 4- दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांची वेळी कापण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे अगदी सगळेच जण चिंतेत आहे. आत्तापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये एकही प्रकरण असं नाही ज्यामध्ये पीडित मुलीने वेणी कापणाऱ्याचा चेहरा पाहिला. यामुळे पोलिसांनाही तपास करण्यात अडथळे येत आहेत. पण सध्या सुरू असलेल्या तपासातून पोलिसांनी दोन मुद्द्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. एकतर ती महिलाच स्वतःची वेळी कापत असावी किंवा तिच्या घरातील सदस्य वेणी कापण्याचा हा प्रकार करत असावे, असा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते,आजपर्यंत जितक्या वेणी कापण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट सारखी आहे. सगळ्याच महिलांची वेणी त्या घरात असताना कापली गेली आहे. जास्त केसेसमध्ये घराचा मुख्य दरवाजा बंद असतानाही वेणी कापल्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा आहेत, पण त्या कॅमेऱ्यामध्ये कोणताही संशयित व्यक्ती दिसत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

पोलिसांनी महिलांची वेणी कापण्याच्या या घटनांबद्दल त्यांच्या सुत्रांकडूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या मागे कोणी बाहेरचा व्यक्ती किंवा टोळी काम करते आहे का ? याची माहिती पोलिसांनी सुत्रांकडून मिळविण्याचा प्रयत्न केला, पण आत्तापर्यंतच्या चौकशीत सुत्रांनाही याबद्दल माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे दिल्लीच्या कांगनहेडीमधील तीन घटना आणि पालम साधनगरमधील एका घटनेबद्दल फॉरेन्सिक एक्सपर्टने ऑफ द रिकॉर्ड सांगितलं, या चार घटनांपैकी दोघांमध्ये वेणी कापण्यासाठी कात्रीचा वापर झाला होता. तर इतर दोन घटनांबद्दलचा निष्कर्ष अजून निघाला नाही. पोलिसांच्या मते, महिलांची वेणी कापण्याच्या घटनांमध्ये जर तंत्र विद्येचा वापर केला गेला असता तर त्याचे इतर दुष्पपरिणाम पण दिसले असते त्यामुळे तंत्र विद्येतून हे होत असल्याचं लोकांचं मत हा फक्त भ्रम आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार,पीडित महिला तणावातून जात असावी, त्या तणावात स्वतःची वेणी कापू शकतात. 

पोलिसांना आलेल्या संशयानंतरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर महिलांनी स्वतःची वेणी कापली असेल तर घटनास्थळी कात्री किंवा इतर वस्तू सापडली असत्या. नाहीतर घरातील कात्रीला केस लागलेले दिसले असते. महिला मनोरूग्ण असेल हे मानसोपचारतज्ज्ञांचं मत ऐकलं, तर स्वतःची वेणी कापून ती महिला कात्री साफ करून ठेवते का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

नेमकं प्रकरण काय ?
दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये घडताना दिसून येत आहे. येथील महिलांनी असा दावा केला आहे की, अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर. उत्तरप्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. 

घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम...
काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत. 

महिलांनी वेण्या घालणंच दिले सोडून...
केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेण्या घालणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.

Web Title: Women bend their own bounty? Police suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.