देशात सरकार कुणाचे ठरवताहेत महिला! १९७१ पासून आजवर महिला मतदारांच्या संख्येत २३५.७३ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 10:55 AM2023-01-07T10:55:59+5:302023-01-07T10:56:14+5:30

लोकसभा, विधानसभा किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये महिला मतदार निर्णायक भूमिका बजावताना दिसतात, हे सुखद चित्र आहे. त्यामुळे देशातील लोकशाही अधिक मजबूत होत आहे. 

Women decide whose government in the country! 235.73 percent increase in the number of women voters since 1971 | देशात सरकार कुणाचे ठरवताहेत महिला! १९७१ पासून आजवर महिला मतदारांच्या संख्येत २३५.७३ टक्के वाढ

देशात सरकार कुणाचे ठरवताहेत महिला! १९७१ पासून आजवर महिला मतदारांच्या संख्येत २३५.७३ टक्के वाढ

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्रामध्ये किंवा राज्यांमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेवर आणावे याबाबत महिलांनी केेलेले मतदान अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केले होते. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली होती. भारताच्या लोकसंख्येत निम्मे प्रमाण महिलांचे आहे. १९७१पासून आजतागायत महिला मतदारांच्या संख्येत २३५.७२ टक्के इतकी वाढ झाली आहे.
लोकसभा, विधानसभा किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये महिला मतदार निर्णायक भूमिका बजावताना दिसतात, हे सुखद चित्र आहे. त्यामुळे देशातील लोकशाही अधिक मजबूत होत आहे. 

१९६२ : प्रथमच स्वतंत्र आकडे
१९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच पुरुष व महिलांच्या मतदानाची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळी पुरुषांनी ६३.३१ टक्के, तर महिलांनी ४६.६३ टक्के मतदान केले होते. 
या निवडणुकांच्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकांत महिलांनी केलेल्या मतदानात सुमारे २० टक्के तर पुरुषांनी केलेल्या मतदानात फक्त तीन टक्के वाढ झाली होती.

विधानसभेतही महिला मतदारांचा वरचष्मा
- विधानसभा निवडणुकांत महिलांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत पुरुषांनी ५९.३४% व महिलांनी ६२.२०% मतदान केले होते. 
- मागील वर्षात उत्तराखंड, मणिपूर, गोवा, हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांत महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केले. 
- गुजरात विधानसभेत निवडणुकांत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी होते. 


लोकसभा निवडणुकांतील मतदार

निवडणुक    वर्ष    पुरुष    महिला    फरक
१३ वी लोकसभा    १९९९    ६३.९७%    ५५.६४%    ८.३३%
१४ वी लोकसभा    २००४    ६१.६६%    ५३.३०%    ८.३६%
१५ वी लोकसभा    २००९    ६०.२४%    ५५.८२%    ४.४२%
१६वी लोकसभा    २०१४    ६७.०९%    ६५.३०%    १.७९%
१७वी लोकसभा    २०१९    ६७.०२%    ६७.१८%    ०.१६%

Web Title: Women decide whose government in the country! 235.73 percent increase in the number of women voters since 1971

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान