Gandhi Jayanti 2020 : महिलांनो, आत्मसंरक्षणासाठी जे करता येईल ते करा! अहिंसावादी बापूंचा संदेश

By हेमंत बावकर | Published: October 2, 2020 12:57 PM2020-10-02T12:57:42+5:302020-10-02T13:04:37+5:30

Mahatma Gandhi message for women's: महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता.

Women, do what you can to defend yourself! Mahatma Gandhi's message to stop rape | Gandhi Jayanti 2020 : महिलांनो, आत्मसंरक्षणासाठी जे करता येईल ते करा! अहिंसावादी बापूंचा संदेश

Gandhi Jayanti 2020 : महिलांनो, आत्मसंरक्षणासाठी जे करता येईल ते करा! अहिंसावादी बापूंचा संदेश

googlenewsNext

मोहनदास करमचंद गांधी....यांना अवघे जग महात्मा गांधी या नावाने ओळखते. आजच्या जगात गुन्हेगारी एवढी वाढली आहे की, बापूंचे विचार समजून त्याचे आचरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. यावर आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणारे बापू काय सांगतात माहित आहे? एका पत्रात महात्मा गांधी यांनी हा सल्ला दिला आहे. 


महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता. बलात्कार झालेल्या स्त्रीचा कोणत्याही प्रकारे तिरस्कार केला जाऊ नये असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी आपल्या मुलांनाही महिलांसोबत आदरपूर्वक वागण्याची सक्त ताकीद दिली होती. आपल्या मर्यादांचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले होते. 


'द माइंड ऑफ महात्‍मा गांधी' पुस्तकात वाईट प्रवृत्ती आणि महिलांवरील अत्याचारावर गांधींचे विचार मांडण्यात आले आहेत. यानुसार गांधींनी म्हटले आहे की, जर महिला हल्लेखोराच्या शारीरिक ताकदीला प्रतिकार करू शकत नसेल तर तिचे पावित्र्यच तिची ताकद बनेल. सीतेचे उदाहरण घ्या. शारीरिक दृष्ट्या सीता रावणासमोर शक्तीहीन होती. मात्र, तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा जास्त शक्तीशाली होती. रावणाने सीतेचे मन अनेक प्रलोभने देऊन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीतेला तो हातही लावू शकला नाही. माझ्या मतानुसार निडर महिला हे जाणते की तिचे पावित्र्यच तिची सर्वात मोठी ढाल आहे. मनुष्यच नाही तर आग्नीही तिच्यासमोर लाजेल, असे गांधी यांनी म्हटले आहे. 

महिलेच्या प्रश्नांना गांधींचे खुले उत्तर
एका महिलेने बापुजींना तीन प्रश्न विचारले होते. यावर त्यांनी दिलेले उत्तर खरेच विचार करायला लावणारे आहे. गांधींनी 1942 मध्ये ‘हरिजनबंधु’ नावाच्या गुजराती नियतकालीकेमध्ये हे उत्तर दिले होते. ''ज्या महिलेवर बल्ताकाराचा प्रसंग ओढवला ती तिरस्काराच्या नाही तर दयेची पात्र आहे. ती स्री जखमी झालेली असते, यामुळे ज्याप्रकारे आपण जखमींची सेवा करते तशीच सेवा तिची केली पाहिजे. शील भंग कोणाचे होते? जी स्त्री शारिरीक संबंधांना तयार होते तिचे. बलात्कार झालेली स्त्री त्या नराधमाला विरोध करते. यामुळे शील भंग हा शब्द बदनामी करतो. यामुळे बलात्कार हा योग्य शब्द त्या स्त्रीबाबत वापरला जावा, असेही गांधी म्हणाले होते. 

Web Title: Women, do what you can to defend yourself! Mahatma Gandhi's message to stop rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.