पगारवाढ मागण्यात महिलाच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:49 AM2018-05-02T05:49:33+5:302018-05-02T05:49:33+5:30

सध्या सर्वत्र ‘अप्रायझल’चा काळ आहे, पण पगारवाढ मागण्यात पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर असल्याचे ‘इंडिड इंडिया’च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

Women have the most to ask for salary increase | पगारवाढ मागण्यात महिलाच आघाडीवर

पगारवाढ मागण्यात महिलाच आघाडीवर

Next

मुंबई : सध्या सर्वत्र ‘अप्रायझल’चा काळ आहे, पण पगारवाढ मागण्यात पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर असल्याचे ‘इंडिड इंडिया’च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
नोकरी प्रदाता क्षेत्रातील ‘इंडिड इंडिया’ने अलीकडेच पगारवाढीशी संबंधित मुद्द्यांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, २०१७-१८च्या अप्रायझल मोसमात एकूण ९३ टक्के कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. त्यामध्ये ६७ टक्के महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणातील २० टक्के महिलांना त्यांच्यापेक्षा पुरुष कर्मचाºयांना अधिक पगार मिळत असल्याचे वाटते. हाच आकडा पुरुषांच्या बाबतीत फक्त ९ टक्के आहे. केवळ ९ टक्के पुरुष स्वत:पेक्षा महिला कर्मचाºयाला अधिक पगार असल्याच्या भावना मांडतात.
पगारवाढीच्या मुद्द्यावरून नोकरी बदलण्याचा विचार करणाºया कर्मचाºयांची टक्केवारी ८० आहे. हे कर्मचारी २५ ते ३४ वयोगटांतील आहेत. ५० टक्के कर्मचारी चांगल्या कामाचे दाखले देऊन पगारवाढ मागण्यासाठी आग्रही आहेत, पण उर्वरित कर्मचारी महागाई, अतिरिक्त जबाबदाºया व कामाचे अतिरिक्त तास यासाठी पगारवाढ मागत आहेत.
ही सर्व स्थिती असतानाही तब्बल ६० टक्के कर्मचारी पगारवाढीच्या तुलनेत अन्य सोईसुविधा मागत आहेत. पगारवाढीऐवजी गरजेनुसार कामाच्या वेळेची मागणी त्यांनी केलीय, तर ४७ टक्क्यांनी वार्षिक सुट्ट्या अधिक देण्याची मागणी केली आहे. ४० टक्के कर्मचारी सुट्ट्यांच्या मोबदल्यात पैसे मागत आहेत. ६३ टक्के कर्मचाºयांनी अधिक वैद्यकीय सुविधांची मागणी केली आहे. मात्र, ४३ टक्के कर्मचारी सध्याच्या वेतनात समाधानी आहेत.

हे सर्वेक्षण २५ ते ४४ वर्षे वयोगटातील कर्मचाºयांचे होते. त्यामध्ये आयटी, टेलिकॉम, शिक्षण, उत्पादन, वित्त व वैद्यकीय क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. भारतातील कर्मचारी महत्त्वाकांक्षी असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून आल्याचे मत, इंडिड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शशी कुमार यांनी व्यक्त केले.

Web Title: Women have the most to ask for salary increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.