शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, केरळ सरकारचा यू-टर्न

By admin | Published: November 7, 2016 05:17 PM2016-11-07T17:17:25+5:302016-11-07T17:17:25+5:30

केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याची तयारी अखेर केरळ सरकारने दर्शवली आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात महिलांना मंदिरात प्रवेशबंदीबाबत सुनावणी झाली.

The women of Sabarila get access to the temple, the Kerala government's U-turn | शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, केरळ सरकारचा यू-टर्न

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, केरळ सरकारचा यू-टर्न

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याची तयारी अखेर केरळ सरकारने दर्शवली आहे.   सोमवारी सुप्रीम कोर्टात महिलांना मंदिरात प्रवेशबंदीबाबत सुनावणी झाली. यावेळी  सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश दिला जावा अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र येथील डाव्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले.  

मंदिराच्या गाभा-यापर्यंत महिलांना जाण्याची परवानगी असायला हवी असं केरळ सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 फेब्रुवारी रोजी होईल. यापुर्वी केरळ सरकारने  शबरीमाला मंदिर समितीच्या बाजुने भूमिका घेतली होती आणि मंदिरात महिलांना प्रवेश बंदीला समर्थन दिलं होतं. मात्र, आज झालेल्या सुनावणीत केरळ सरकारने यू-टर्न घेतला.  येथील यंग लॉयर्स असोसिएशन या संघटनेने 2006 मध्ये बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती.  

Web Title: The women of Sabarila get access to the temple, the Kerala government's U-turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.