महिलांना प.बंगालमध्ये पाठवा 15 दिवसांत बलात्कार होईल - भाजपा नेत्या
By Admin | Published: July 14, 2017 06:38 PM2017-07-14T18:38:56+5:302017-07-14T18:53:23+5:30
प. बंगाल येथील भाजपाच्या नेत्या रुपा गांगुली यांनी महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 14 - प. बंगाल येथील भाजपाच्या नेत्या रुपा गांगुली यांनी महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ममता बॅनर्जी सरकारचे समर्थन करणाऱ्यांनी आपल्या घरातील स्त्रीला पं. बंगालमध्ये पाठवायला हवे. रुपा गांगुलीने असा दावा केला आहे की, पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पाठिंब्याशिवाय येणाऱ्या महिलांवर 15 दिवसांच्या आत बलात्कार होईल.
रूपा गांगुली माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, जे व्यक्ती ममता बॅनर्जी सरकारचे समर्थन करतात त्यांनी मुलगी, बहीण, सून किंवा बायकोला पं. बंगालमध्ये पाठवून पहायला पाहिजे, त्यांच्यावर 15 दिवसांत बलात्कार न झाल्यास मला सांगा.
रुपा गांगुलीनं केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या अडचणात येण्याची शक्यता आहे. पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे गांगुली यांच्या वक्तव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या आठवड्यात पं. बांगालमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी रुपा गांगुली प्रकाशझोतात आल्या होत्या. फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याचप्रकरणावर रुपा गांगुली यांच्या एका समर्थकाने फेसबुक आपत्तीजनक पोस्ट करत त्यांना टॅग केलं होतं. यावर गांगुली यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
सध्या पं. बंगालमधील तणावसदृश्य परिस्थिती निवळायला सुरूवात झाली आहे. फेसबूक पोस्टमुळे भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी सकाळपासून दुकानं, बाजार आणि व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. लोकांनी घराच्या बाहेर पडायला सुरूवात केली असून जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात कुठल्याही प्रकारच्या हिंसेची घटना घडलेली नाही.