आई झाल्यावर नोकरी सोडली आता करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्या महिलांना करते काम शोधण्यात मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:53 PM2023-03-08T12:53:45+5:302023-03-08T12:59:36+5:30

आई झाल्यानंतर तिने स्वत: साडेतीन वर्षांचा करिअर ब्रेक घेतला. यापूर्वी ती बंगळुरूमधील बायो फार्मा उत्पादन कंपनीत काम करत होती.

womens day 2023 entrepreneur neha bagaria who helps women to get job after career break | आई झाल्यावर नोकरी सोडली आता करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्या महिलांना करते काम शोधण्यात मदत

फोटो - झी न्यूज

googlenewsNext

8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. 2023 मध्ये, महिला दिनाची थीम इनोवेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वेलिटी आहे. याद्वारे तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या महिला आणि मुलींची ओळख करून देण्यात येत आहे, महिलांना कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यापैकी एक करिअर ब्रेक देखील आहे. कधी महिलांना आई होण्यासाठी करिअर ब्रेक घ्यावा लागतो तर कधी इतर कारणांमुळे. अशा महिलांना मदत करण्यासाठी नेहा बगारियाने jobsforher.com स्टार्टअप सुरू केले.

2015 मध्ये सुरू केलं स्टार्टअप

नेहा बगारियाने मार्च 2015 मध्ये jobsforher.com वेबसाइट सुरू केली. आई झाल्यानंतर तिने स्वत: साडेतीन वर्षांचा करिअर ब्रेक घेतला. यापूर्वी ती बंगळुरूमधील बायो फार्मा उत्पादन कंपनीत काम करत होती. नेहाने अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या वॉर्टन स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. तिने फायनान्स, मार्केटिंग आणि मॅनेजमेंट ऑफ इन्फोर्मेशन सिस्टममध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. 9,000 हून अधिक कंपन्यांमध्ये तिच्या पार्टनर आहेत. 30 लाखांहून अधिक महिलांना नोकऱ्या शोधण्यात मदत केली जात आहे. 

"मला माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा"

झी बिझनेसशी संवाद साधताना नेहाने सांगितले की, "जेव्हा मला मुलं झाली, तेव्हा मी करिअरमध्ये ब्रेक घेतला होता. साडेतीन वर्षांनंतर जेव्हा मी कामावर परत आले तेव्हा मला जाणवलं की पुन्हा नव्याने सुरुवात करणे किती कठीण आहे. मला माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. माझ्या पतीने मला मुलांच्या संगोपनात खूप मदत केली. यामुळेच मी पुन्हा कामावर येऊ शकले. मी माझ्या मैत्रिणी आणि नातेवाईकांमधील महिलांशी बोललो ज्यांनी करिअरमध्ये ब्रेक घेतला होता. करिअरच्या ब्रेकनंतर पुन्हा काम सुरू करण्यात अडचणी येतात हे लक्षात आल्यावर मी त्यांच्यासाठी नोकऱ्या निर्माण केल्या."

नेहा सांगते, 'गेल्या आठ वर्षांत आम्ही कंपन्यांना समजावून सांगितले की, महिला करिअर ब्रेक घेतात याचा अर्थ महिला काम करत नाहीत असा होत नाही. ती एक वेगळे काम करत आहे. या कामामुळे त्यांचे जीवन कौशल्य खूप सुधारले आहे. ही कौशल्ये त्यांच्या नोकऱ्यांमध्ये टीमवर्क, व्यवस्थापन, संयम इत्यादी गोष्टींमध्ये खूप मदत करतील. याशिवाय या महिला कोणत्याही नोटीस पीरियडशिवाय तुमच्यात सामील होऊ शकतात. याशिवाय पार्ट टाईम किंवा घरून काम करणे यासारख्या सुविधा असतील तर या महिला ते काम आनंदाने करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: womens day 2023 entrepreneur neha bagaria who helps women to get job after career break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.