कर्तव्यनिष्ठेला सलाम! 10 दिवसांची प्रसूती रजा; 11व्या दिवशी बाळाला घेऊन ड्युटीवर पोहचल्या IPS

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:47 AM2023-03-08T10:47:44+5:302023-03-08T11:05:12+5:30

IPS Nitika Gehlot : महिलांसाठी एक उदाहरण बनलेल्या एसपी नितिका गहलोत सध्या आपल्या मुलीला मांडीवर घेऊन कार्यालयात लोकांच्या तक्रारी ऐकतात आणि सर्व जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. 

womens day 2023 special IPS Nitika Gehlot reached on duty with newborn girl after 10 days maternity leave | कर्तव्यनिष्ठेला सलाम! 10 दिवसांची प्रसूती रजा; 11व्या दिवशी बाळाला घेऊन ड्युटीवर पोहचल्या IPS

फोटो - NBT

googlenewsNext

महिला आज प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करत आहेत. नोकरी असो वा व्यवसाय, सर्वच क्षेत्रात महिला आता आपले कौशल्य दाखवत आहेत. काही महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश मिळवले असून आदर्श बनून समाजात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. असाच एक आदर्श आहेत डॉ. नितिका गहलोत. हरियाणाच्या हांसी पोलीस जिल्ह्याच्या पोलीस कॅप्टन. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.

IPS नितिका गहलोत यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचा अंदाज यावरून लावता येतो की त्यांनी केवळ 10 दिवसांची प्रसूती रजा घेतली आणि 11व्या दिवशी आपल्या नवजात मुलीला हातात घेऊन कर्तव्यावर असलेल्या जिल्हा पोलीस कार्यालयात पोहोचल्या. एसपी मॅडमची कामाविषयीची तळमळ पाहून कार्यालयात तैनात असलेले सर्व कर्मचारी थक्क झाले. महिलांसाठी एक उदाहरण बनलेल्या एसपी नितिका गहलोत सध्या आपल्या मुलीला मांडीवर घेऊन कार्यालयात लोकांच्या तक्रारी ऐकतात आणि सर्व जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. 

गेल्या अडीच वर्षांपासून हांसी पोलीस जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या आयपीएस नितिका गेहलोत यांनी या भागातील गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलिसिंगबाबत त्या पूर्ण सक्रिय राहतात आणि छोट्या छोट्या घटनांवर स्वतः लक्ष ठेवतात. गेल्या वर्षी, संपूर्ण राज्यात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे सोडवण्यात दुसरा आणि अमली पदार्थांची प्रकरणे पकडण्यात तिसरा नंबर होता. याशिवाय 4 किलो अफूचे हायप्रोफाईल प्रकरणही एसपी नितिका गहलोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी पकडले. याप्रकरणी नेपाळमधून अटक करण्यात आली होती. वाहनचोरीच्या घटनांमध्येही त्यांच्या नेतृत्वाखाली हांसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

संपूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या एसपी नितिका गेहलोत या महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. एसपींच्या कामाप्रती समर्पित भावनेने परिसरातील महिलांना प्रेरणा मिळत आहे. मात्र, स्वत: एसपींना याबाबत विचारले असता, ती आपले सामान्य कर्तव्य बजावत असल्याचे उत्तर आहे. आयपीएस अधिकारी असूनही त्या अत्यंत साधेपणाने राहते आणि कर्मचाऱ्यांशी अतिशय नम्रतेने वागतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: womens day 2023 special IPS Nitika Gehlot reached on duty with newborn girl after 10 days maternity leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.