नवरा असावा असा! लग्नानंतर पतीने दिली साथ; पत्नी झाली शास्त्रज्ञ, अर्शीची ISRO मध्ये निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 03:14 PM2023-03-07T15:14:27+5:302023-03-07T15:16:15+5:30
पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पत्नी शास्त्रज्ञ झाल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पत्नी शास्त्रज्ञ झाल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. पतीच्या मदतीने तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवून आपली इच्छा पूर्ण केली. होय, अर्शी नावाच्या या महिलेची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच ISRO मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून निवड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील टिळक गंज येथे राहणाऱ्या कुरेशी कुटुंबातील सून अर्शी नाजची इस्रो ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून निवड झाली आहे.
दमोह जिल्ह्यातील लोकांनाही तिच्या यशाचा अभिमान आहे कारण अर्शी नाज ही दमोहची मुलगी आहे. दमोह शहरातील अर्शी नाज ही तीन बहिणी आणि एका भावामध्ये दुसरी मुलगी असून अर्शीने आपल्या कुटुंबासह दोन जिल्ह्यांचे नाव मोठं केलं आहे. अर्शी दहावीत असताना तिचे वडील सोडून गेले. आई खुर्शीद बेगम यांनी नोकरी करून मुलांचे उत्तम संगोपन केले. शेख अंजुम कुरेशी यांनी हे जग सोडल्यानंतर खुर्शीद बेगम यांनी आपल्या मुलांना धैर्याने वाढवले.
अर्शीची आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून निवड झाली आहे. अर्शीचा विवाह 2016 मध्ये सागर येथे डॉ. असद उल्लाह कुरेशी यांच्याशी झाला. लग्नानंतर असदने प्रथम अर्शीला एम.टेकला अभ्यासात प्रवेश मिळवून दिला आणि अर्शीनेही पदवी पूर्ण केली. अर्शीने कठोर परिश्रम आणि तिच्या अथक परिश्रमाने पहिल्याच प्रयत्नात जे.आर.एफ. एवढी अवघड परीक्षा उत्तीर्ण झाली.
अर्शीबद्दल जाणून घेणे जगासाठी देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या घरातील मुली आणि सुनांना आधार द्याल, त्यांची स्वप्ने साकार करण्यात मदत कराल. नोकरी ही केवळ पैशासाठी नसते, तर त्यातून आत्मविश्वासही येतो. अर्शीला तिच्या आईचा पाठिंबा मिळाला, त्यानंतर तिला तिच्या पतीची साथ मिळाली, तर असदचे वडील आणि अर्शीचे सासरे समी कुरेशी यांनीही तिला सून नव्हे तर मुलीसारखे वागवले. आणि लग्नानंतर मुलाच्या इच्छेनुसार आपल्या सुनेला M.Tech मध्ये प्रवेश मिळवून दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"