महिला दिन ८ मार्चलाच का?
By Admin | Published: March 8, 2016 08:54 AM2016-03-08T08:54:51+5:302016-03-08T09:18:01+5:30
रवर्षी जगभरात ८ मार्च हा ' जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक करत आणि त्यांच्याप्रती सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते.
>ऑनलाइन लोकमत
दरवर्षी जगभरात ८ मार्च हा ' जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक करत आणि त्यांच्याप्रती सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते. तसेच अर्थ, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थही हा दिवस साजरा केला जातो. मात्र ८ मार्चलाच हा दिवस का साजरा होतो?
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने करत कामाच्या ठिकाणी सुधारणा करण्याची मागणी केली. दहा तासांचा दिवस व कामाच्या जागी सुरक्षितता या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. तसेच लिंग, वर्ण, संपत्ती व शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे करण्यात आली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला आणि तो पारितही झाला. त्यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात पहिला महिला दिन कधी साजरा झाला?
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा 'महिला दिवस' १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये, शाळा, कॉलेजेस एवढेच नव्हे तर सोशल मीडियावरमधूनही ८ मार्च जोरदार साजरा होतो.
महिला दिनानिमित्त काही कर्तृत्ववान महिलांची ओळख...
छवी राजावत :
राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील सोडा या गावच्या सरपंच छवी राजावत या भारतातील पहिल्या उच्चशिक्षित सरपंच ठरल्या आहेत. राजावत यांनी बंगळूरु येथील रिशी व्हॅली स्कूल आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम येथे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुण्यात व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रमध्ये काम केले. मात्र, आजोबा रघुवीर सिंग यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांना गावाचा विकास करण्याची ओढ लागली होती. भारतातील खेडय़ाची ओळख आणि चित्र बदलण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या छवी यांनी वयाच्या 29 व्या वर्षी सोडा गावचे सरपंचपद स्वीकारले. भ्रष्टाचार, हिंसा, दुर्लक्ष, राजकारणातील वाईट प्रवृत्ती यांचा नाश करण्याच्या उद्देशाने त्यांनी विकासाचे अस्त्र हाती घेतले आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता येण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गावात नागरी सुविधा निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. कृषिक्षेत्रत प्रगती व्हावी, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी त्यांनी कामाचा वसा हाती घेतला आहे. जयपूर येथील राजावत कुटुंबीयांचा असलेल्या हॉटेलचा कारभारही छवी पाहतात. घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणारी त्यांची स्वत:ची शाळा आहे. अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या गरिबीसंदर्भातील जागतिक परिषदेत छवी सहभागी झाल्या होत्या.
निर्मला कांदळगावकर :
घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणा:या विवम अॅग्रोटेक या कंपनीच्या निर्मला कांदळगावकर संचालिका आहेत. रासायनिक खतांच्या वापरामुळे अनेक शेतक:यांच्या जमिनी नापीक झाल्याचे कांदळगावकर यांच्या लक्षात आले. गांडुळखताचा पर्याय वापरायचा असेल तरी त्याची निर्मितीची पध्दत वेळखाऊ आणि खार्चिक होती. निर्मला यांना पारंपरिक पद्धतीतील तोटे दूर करून, ‘स्वरूप’ या गांडूळखत सयंत्रंची निर्मिती केली. तंत्रज्ञानाचा वापर करून, कंपनीने बायोडिग्रीडेबल वेस्टपासून ऊर्जानिर्मितीचे तंत्र त्यांनी विकसित केले. . पर्यावरण विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणत्यांनी घेतले आहे. त्यांनी बनवलेल्या गांडूळखत संयंत्रच्या साहाय्याने एका महिन्यात 1 ते 1.5 टन गांडूळखत बनविता येते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तरांचल, गुजरात, गोवा आणि दिल्ली या ठिकाणी त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. 2010मध्ये ‘अवनी मित्र’, 2013 मध्ये ‘पुण्यरत्न’, 2014 मध्ये ‘चाणक्य पुरस्कार’, 2015 मध्ये वूमन सुपर अचिव्हर अॅवॉर्ड असे अनेक सन्मान निर्मला कांदळगावकर यांना मिळाले आहेत.
डॉ. मानबी बंडोपाध्याय :
डॉ. मानबी बंडोपाध्याय या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी प्राचार्य ठरल्या आहेत. त्यांनी बंगाली साहित्यामध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली आहे. याआधी त्यांनी विवेकानंद सतोवार्षिकी महाविद्यालयात बांगला भाषेच्या सहायक प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. ‘ट्रान्सजेंडर लिटरेचर’ या विषयामधील पीएच.डी. मिळवणा:या त्या पहिल्या तृतीयपंथी आहेत. ‘ओबो मानब’ हे तृतीयपंथींवरील पहिले मासिक बंडोपाध्याय यांनी प्रकाशित केले. बंडोपाध्याय यांनी 2क्क्3 मध्ये नाव आणि लिंग बदलाचा निर्णय घेतला. त्यांची बंगाली भाषेतील ‘ओंतोहिन ओंतोरिन प्रोसितोवहोर्तिका’ (एंडलेस बाँडेज) ही कादंबरी सर्वाधिक खपाची ठरली. ‘थर्ड जेंडर इन बंगाली लिटरेचर’ या पुस्तकाच्याही मानबी बंडोपाध्याय या लेखक आहेत.