महिला पायलटच्या लैंगिक छळाची उच्च पातळीवर चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 06:22 AM2019-05-16T06:22:02+5:302019-05-16T06:22:15+5:30

एअर इंडियाच्या एका महिला पायलटने तिच्या कमांडरविरुद्ध केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीची उच्च पातळीवर चौकशी होणार आहे.

Women's pilot sexual assault will be investigated at a high level | महिला पायलटच्या लैंगिक छळाची उच्च पातळीवर चौकशी होणार

महिला पायलटच्या लैंगिक छळाची उच्च पातळीवर चौकशी होणार

Next

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका महिला पायलटने तिच्या कमांडरविरुद्ध केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीची उच्च पातळीवर चौकशी होणार आहे. एअर इंडियाने बुधवारी ही माहिती दिली. महिला पायलटने दिलेल्या तक्रारीनुसार कथित लैंगिक छळाचा प्रकार ५ मे रोजी हैदराबादेत कमांडरकडून तिला प्रशिक्षण दिले जात असताना घडला. छळाचा विषय जसा आमच्या निदर्शनास आल्यावर लगेचच आम्ही त्याच्या चौकशीसाठी उच्च पातळीवरील चौकशी समिती स्थापन केली, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले.
पायलटने तक्रारीत आरोप केला की, कमांडरने ५ मे रोजी प्रशिक्षण सत्र संपल्यानंतर आपण दोघांनी हैदराबादेत रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवण केले पाहिजे, असे सुचवले. आम्ही रात्री सुमारे ८ वाजता रेस्टॉरंटमध्ये गेलो. कमांडरने तो त्याच्या वैवाहिक आयुष्यात कसा निराश आणि असमाधानी आहे हे सांगायला सुरुवात केली. त्याने मला काही असभ्य आणि अश्लील गोष्टी विचारल्या, असे सांगून तिने तक्रारीत म्हटले आहे की, एका वेळी तर मी त्याला या कोणत्याच गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचे नाही, असे सांगून कॅब बोलावली.



खूपच धक्का बसला, फार अस्वस्थ वाटत होते
कॅब येईपर्यंतच्या अर्ध्या तासात कमांडरचे वर्तन अतिशय वाईट होते. त्याच्या वर्तनाचा मला खूपच धक्का बसला आणि मला फार अस्वस्थ वाटत होते, मी भ्यालेली आणि अपमानित झालेली होते, असे तिने म्हटले. हे सगळे प्रकरण एअर इंडियाला कळविले पाहिजे म्हणजे पुन्हा असे काही भविष्यात इतरांबाबत घडणार नाही, असे मला नैतिकदृष्ट्या वाटले, असेही तक्रारीत तिने म्हटले.

Web Title: Women's pilot sexual assault will be investigated at a high level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.