समुद्रकिनाऱ्यावर लाकडाचे प्रसन्न घर
By admin | Published: March 13, 2017 12:41 AM2017-03-13T00:41:24+5:302017-03-13T00:41:24+5:30
तुम्ही जर घराच्या बाहेर पण घरासारख्या सुखसोयींच्या शोधात असाल तर हे घर नक्की बघून घ्या कारण ते आहेच तसे लक्षवेधी, सुंदर, सुखावह.
तुम्ही जर घराच्या बाहेर पण घरासारख्या सुखसोयींच्या शोधात असाल तर हे घर नक्की बघून घ्या कारण ते आहेच तसे लक्षवेधी, सुंदर, सुखावह. मेक्सिकोतील जुलुचुका येथील प्लाया व्हिवा हॉटेल. ते अकॅपुलकोच्या उत्तरेला समुद्रकिनाऱ्यावर आहे व ते संपूर्णपणे झाडांच्या फांद्या, बांबू व लाकडांपासून बनवलेले आहे. आम्हाला समुद्र किनारे आणि झाडांपासून बनवलेली घरे आवडतात. ती लक्षात घेऊन हे घर बनवलेले आहे. ही घरे झाडावर काही ओंडके, मोठ्या फांद्या वापरून कशीतरी शाकारलेली नाहीत. ती विश्वास बसणार नाहीत अशी ऐषआरामी, सुखद, आनंददायी, सुखसोयींनीयुक्त, प्रसन्न व आरामदायी आहेत. किनारा बघण्यासाठी त्याला बाल्कनी व प्रशस्त म्हणता येईल अशी झोपायची खोली आहे. आनंददायी शॉवर्सचा आनंद घेता येईल. घराबाहेर राहण्याचा, सुटी घालवण्याचा आनंद लुटता येईल हा उद्देश समोर ठेवून या घरांची व त्यातील सुखसोयीं रचना केली गेली आहे. या घरांची लाकडे निसर्गाशी एकरूप झाली आहेत. घराला भरपूर रुंद दारे आणि उघडी बैठकीची खोली व तेथून समुद्राचा आनंद घेता येईल.
या घरांत सौर उर्जेचा वापर केलेले गरम पाणी आहे व वीजेसाठीही सौरउर्जेचा वापर केला गेलेला आहे.
या अभिनव घरात राहूनही तुम्हाला कंटाळा आला असेल तर भटकायला जवळच पाम झाडे, समुद्र किनाऱ्यावरील जंगलही आहे.