मनपा कर्मचार्‍यांचे पगार वाटप सुरू ४० टक्के पगार आटोपले: उर्वरित दिवाळीपूर्वी अदा करणार

By admin | Published: October 22, 2016 12:47 AM2016-10-22T00:47:04+5:302016-10-22T00:47:04+5:30

जळगाव: बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करणार्‍या मनपाच्या कर्मचार्‍यांचा सप्टेंबर महिन्याचा पगारदेखील मिळालेला नसल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शासनाकडून मिळालेल्या एलबीटी अनुदानातून कर्जाचे हप्ते भरल्यानंतर शिल्लक रक्कम व कराच्या वसुलीतून येत असलेल्या निधीतून पगार वाटप सुरू करण्यात आले असून शुक्रवारपर्यंत ४० टक्के कर्मचार्‍यांचे पगार करण्यात आले. उर्वरित कर्मचार्‍यांचे पगारही दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Work on allocation of NMC employees starts 40%: The remaining will be paid before Diwali | मनपा कर्मचार्‍यांचे पगार वाटप सुरू ४० टक्के पगार आटोपले: उर्वरित दिवाळीपूर्वी अदा करणार

मनपा कर्मचार्‍यांचे पगार वाटप सुरू ४० टक्के पगार आटोपले: उर्वरित दिवाळीपूर्वी अदा करणार

Next
गाव: बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करणार्‍या मनपाच्या कर्मचार्‍यांचा सप्टेंबर महिन्याचा पगारदेखील मिळालेला नसल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शासनाकडून मिळालेल्या एलबीटी अनुदानातून कर्जाचे हप्ते भरल्यानंतर शिल्लक रक्कम व कराच्या वसुलीतून येत असलेल्या निधीतून पगार वाटप सुरू करण्यात आले असून शुक्रवारपर्यंत ४० टक्के कर्मचार्‍यांचे पगार करण्यात आले. उर्वरित कर्मचार्‍यांचे पगारही दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनपा कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी दरमहा ५ कोटी २० लाख रुपये इतका खर्च लागतो. या वेतनाचे मनपाने पेन्शन, आरोग्य व दवाखाने विभाग, पाणीपुरवठा विभाग व इतर असे चार टप्पे केले आहेत. त्यानुसार निधी अपूर्ण असल्यास टप्प्याटप्प्याने पगार वाटप केले जाते. शासनाकडून या महिन्यातील एलबीटीचे ६ कोटी ६५ लाखांचे अनुदान मनपास प्राप्त झाले. त्यातून हुडकोचे ३ कोटी व जिल्हा बँकेचा कर्जाचा हप्ता १ कोटी असा ४ कोटीचा हप्ता भरण्यात आला. उर्वरित २ कोटी ६५ लाखांतून अत्यावश्यक खर्च वगळता उर्वरित रक्कमेतून तसेच करवसुली, एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नातून कर्मचार्‍यांचे पगार अदा करण्यास प्रारंभ झाला आहे. गुरुवारी आरोग्य व दवाखाना विभागातील कर्मचार्‍यांचे पगार अदा झाले. शुक्रवारी पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांचे पगार करण्यात आले. उर्वरित दोन टप्प्यातील पगारही तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Work on allocation of NMC employees starts 40%: The remaining will be paid before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.