गाळे व १३५ च्या ठरावावर १५ दिवसांनी कामकाज न्यायालय: सरकारतर्फे अभियोक्ता नियुक्त

By admin | Published: March 22, 2016 12:40 AM2016-03-22T00:40:27+5:302016-03-22T00:40:27+5:30

जळगाव : महापालिकेतील ठराव १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे कामकाज पहाण्यासाठी विशेेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. धोरडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रश्नी आता दोन आठवड्यानंतर कामकाज होणार आहे.

Work Court of 15 days on the resolution of the castle and 135: appointed by the government as a prosecutor | गाळे व १३५ च्या ठरावावर १५ दिवसांनी कामकाज न्यायालय: सरकारतर्फे अभियोक्ता नियुक्त

गाळे व १३५ च्या ठरावावर १५ दिवसांनी कामकाज न्यायालय: सरकारतर्फे अभियोक्ता नियुक्त

Next
गाव : महापालिकेतील ठराव १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे कामकाज पहाण्यासाठी विशेेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. धोरडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रश्नी आता दोन आठवड्यानंतर कामकाज होणार आहे.
महापालिकेतील ठराव क्रमांक १३५ बाबत निर्णय घेण्यात शासनातर्फे झालेली दिरंगाई व अपूर्ण निर्णय देणे तसेच गाळ्यांसंदर्भात दाखल वेगवेगळ्या याचिकांवर एकत्रित कामकाजाचे उच्च न्यालयाचे निर्देश होते. त्यानुसार आज याप्रश्नी न्या. आर.एम. बोरडे व न्या. चिमा यांच्या बेंचसमोर कामकाज होते. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती मात्र याचिकाकर्त्यांनी न्यायालयात आक्षेप नोंदविल्याने सरकारने आता आपल्यातर्फे कामकाज पहाण्यासाठी ॲड. आर. एन. धोरडे पाटील यांची निवड केली आहे. सरकारपक्षातर्फे ते हजर होते. मात्र आज कोणतेही कामकाज न झाल्याने न्यायालयाने दोन आठवड्यानंतर कामकाज होईल असे सांगितले. मनपाचे आयुक्त संजय कापडणीस हे स्वत: न्यायालयात हजर होते. १३५ च्या ठरावा संदर्भातील याचिका दाखल करणारे डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यातर्फे न्यालयात ॲड. विनोद पाटील हे कामकाज पहात आहेत.

Web Title: Work Court of 15 days on the resolution of the castle and 135: appointed by the government as a prosecutor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.