सासंद आदर्श गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरु
By admin | Published: February 18, 2015 11:54 PM2015-02-18T23:54:26+5:302015-02-18T23:54:26+5:30
पुणे: सासंद आदर्श ग्राम योजने अतंर्गत जिल्ह्यातील आठ गावे खासदरांनी दत्तक घेतली असून, या गावांचा सूक्ष्म विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
Next
प णे: सासंद आदर्श ग्राम योजने अतंर्गत जिल्ह्यातील आठ गावे खासदरांनी दत्तक घेतली असून, या गावांचा सूक्ष्म विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांनी जिल्ह्यातील आठ गावे दत्तक घेतली आहेत. या योजनेचा कालावधी केवळ दहा महिन्याचा असल्याने तातडीने विविध विकास कामे करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनाननुसार प्रथम गावांचा डिजिटल सर्व्हे व गावांच्या भौगोलिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन सर्वंकश विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर गावांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी आवश्यक असलेला निधी कसा उपलब्ध करायचा याबाबच विचार करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यात गावांची सामाजिक -आर्थिक व मानव विकासाच्या स्थितीचे अवलोकन, पायाभूत सुविधा, नैसर्गिक साधने, गावातील ग्रामपंचायत समित्या, शासकीय कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांचे तपशील, ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजना, कार्यक्रम, ग्रामपंचायतीचे वित्तीय तपशील आदी गोष्टींचा विकास आराखड्यात समावेश करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.