आठ नगरपालिकांच्या ४२ हरकतींवर कामकाज १९ तक्रारदार गैरजर : लेखी व तोंडी पुरावे घेतले
By admin | Published: July 18, 2016 11:31 PM2016-07-18T23:31:24+5:302016-07-18T23:31:24+5:30
जळगाव : जिल्ातील १२ नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना आणि सभासद आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या ४२ हरकतींवर सोमवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे कामकाज झाले. यावेळी १९ तक्रारदार गैरहजर राहिले.
Next
ज गाव : जिल्ातील १२ नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना आणि सभासद आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या ४२ हरकतींवर सोमवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे कामकाज झाले. यावेळी १९ तक्रारदार गैरहजर राहिले.डिसेंबर २०१६ अखेर मुदत संपत असलेल्या १२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या नगरपालिका क्षेत्रातील ३६८ नागरिकांनी वॉर्ड रचनेसंदर्भात हरकती दाखल केल्या आहेत. सोमवारी पारोळा, रावेर, धरणगाव, चोपडा, पाचोरा, अमळनेर, यावल, फैजपूर या आठ नगरपालिका क्षेत्रातील ४२ हरकतींवर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुनावणी झाली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सुनावणी दुपारी दोन वाजेपर्यंत चालली. यात १९ हरकतदार गैरहजर होते. प्रत्यक्षात २३ हरकतदारांचे लेखी व तोंडी स्वरुपात म्हणणे ऐकून घेण्यात आले. यासोबत त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.सुनावणीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर हरकती गुणवत्तेवर आयुक्तांनी शिफारास करावी यासाठी बंद करण्यात आल्या. जिल्हाधिकारी याबाबतचा एकत्रित अहवाल हा २७ जुलै पर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर हरकतदाराचे म्हणणे, मुख्याधिकार्यांचा अभिप्राय तसेच जिल्हाधिकार्यांचे निष्कर्ष या आधारावर विभागीय आयुक्त त्याबाबत निर्णय घेणार आहेत.मंगळवारी चाळीसगाव तर गुरुवार २१ रोजी भुसावळ नगरपालिका क्षेत्रातून आलेल्या हरकतींवर कामकाज होणार आहे.