फेसबुकवरील मित्राच्या मदतीने सुनेने केले असे काम; कुटुंबीयही झाले हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 03:08 PM2019-01-23T15:08:43+5:302019-01-23T15:09:10+5:30
इंद्रजीत शर्मा यांच्या मुलाचे लग्न सप्टेंबर 2018 मध्येच झाले होते.
फिल्लौर : फिल्लौरमधील एका प्रतिष्ठीत घराण्याच्या सुनेने असा प्रताप केला आहे, की कुटुंबीयही हैराण झाले आहेत आणि या प्रकाराची चर्चाही मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुख्य बाजारात कॉस्मेटिकची दुकान असलेल्या इंद्रजीत शर्मा यांच्या घरात मोठी चोरी झाली. यामध्ये 15 लाख रुपयांची रोख आणि 25 तोळे सोने लंपास करण्यात आले. प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर खरा प्रकार उघड झाला.
धक्कादायक म्हणजे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेने हा प्रकार केला आहे. इंद्रजीत शर्मा यांच्या मुलाचे लग्न सप्टेंबर 2018 मध्येच झाले होते. त्याचे वडील आणि तो दुकानात गेला होता. तसेच त्याची आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. जेव्हा राकेश हा दुकानातून घरी गेला तेव्हा कपाटातील पैसे आणि दागिने गायब असल्याचे लक्षात आले. यावेळी इंद्रजीत शर्मा यांनी सुनेला याबाबत विचारले असता तिने माहित नसल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. तपासामध्ये घराच्या गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे दिसले.
या कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमध्ये इंद्रजीत शर्मा यांची सून एका युवकाला बॅग देत असल्याचे आणि परत घरात जात असल्याचे दिसले. यावरून तिच्याकडे संशयाची सुई वळली. यानंतर पोलिसांनी तिच्या या फेसबुक मित्रालाही ताब्यात घेतले.
तीन महिन्यांत सूत जुळले...
तपासामध्ये फेसबूकवर मैत्री झालेल्या या युवकाबरोबर नंतर ही सून फोनवरही बोलायला लागली होती. दिवसभर घरात कोणी नसल्याचे समजल्यावर हा युवक तिच्या घरीही येऊ लागला होता. पोलिसांना सुनेला आणि तिच्या फेसबुकवरील मित्राला अटक केली आहे.