लुटारूंना त्यांच्या योग्य जागी पाठवण्याचं काम सुरू आहे- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 08:23 PM2019-09-12T20:23:43+5:302019-09-12T20:23:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड शहरातील रांचीमध्ये विधानसभेच्या नव्या भवनाचं उद्घाटन केलं आहे.

Work is on to send the robbers to their proper place - Modi | लुटारूंना त्यांच्या योग्य जागी पाठवण्याचं काम सुरू आहे- मोदी

लुटारूंना त्यांच्या योग्य जागी पाठवण्याचं काम सुरू आहे- मोदी

Next

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड शहरातील रांचीमध्ये विधानसभेच्या नव्या भवनाचं उद्घाटन केलं आहे. त्यानंतर मोदींनी किसान मानधन योजनेचा शुभारंभ केला आहे. मोदींनी अनेक विकास परियोजनांचं उद्घाटन केलं आहे. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, आमचं सरकार प्रत्येक भारतीयाला सामाजिक सुरक्षा कवच पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मार्चपासून आम्ही अशी पेन्शन योजना राबवली आहे जी की, असंघटित क्षेत्रातील कामगारांना फायदेशीर ठरत आहे. विकास ही आमची प्राथमिकता आहे. विकासाचा आम्ही केलेल्या आश्वासनाही अजूनही ठाम आहोत. आज ज्या वेगानं देश प्रगती करतोय तो वेग थक्क करणारा असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. 

झारखंडमध्ये गरिबांशी निगडीत असलेल्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवल्या जात आहेत. आयुष्यमान भारतसह शेतकऱ्यांशी संबंधित योजनांची सुरुवात केली आहे. गेल्या 100 दिवसांत देशाने केवळ ट्रेलर पाहिला आहे, पिक्चर अजून बाकी आहे. जनतेची लूट करणाऱ्यांना त्यांच्या योग्य जागी पोहचवण्याचा आम्ही संकल्प केला आहे, त्यावर कामदेखील सुरू आहे आणि काही जण गेले देखील आहेत. जम्मू-काश्मीरच्या विकासावरही आमचे लक्ष केंद्रित आहे. 

‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’ आणि ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ या दोन्ही योजनांशी २२ कोटींपेक्षा जास्त देशवासी जुडले असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, यातील 30 लाखांपेक्षा अधिकजण झारखंडमधीलच आहेत, असं मोदींनी सांगितलं आङे. मोदींनी साहेबगंज येथील मल्टी मॉडेल हबचे उद्घाटन केले असून, या जलमार्गाद्वारे बांगलादेश, म्यानमार व इतर काही देशांमध्येही मालाची वाहतूक करणे शक्य होणार आहे.

Web Title: Work is on to send the robbers to their proper place - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.