टीव्ही शोमध्ये काम: कोर्टाने सिद्धू यांना फटकारले

By admin | Published: April 7, 2017 06:49 PM2017-04-07T18:49:52+5:302017-04-07T18:49:52+5:30

मंत्रिपद मिळाल्यानंतरही टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करण्यासाठी अडून बसलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग

Work on TV shows: Court rebuked Siddhu | टीव्ही शोमध्ये काम: कोर्टाने सिद्धू यांना फटकारले

टीव्ही शोमध्ये काम: कोर्टाने सिद्धू यांना फटकारले

Next
>ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 7 -  मंत्रिपद मिळाल्यानंतरही टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करण्यासाठी अडून बसलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना न्यायालयाने फटकारले आहे.  एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना चंदिगड येथील पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने सांगितले की केवळ कायदा म्हणजेच सर्व काही असे नाही. पण नैतिकता आणि शुचिता या गोष्टीनाही काही अर्थ असतो. जर तुम्हीच कायद्याचे पालन करणार नसाल तर कोण करणार असा सवालही न्यायालयाने यावेळी केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मे रोजी होणार आहे. 
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर कॉमेडी शोच्या मैदानातही नवज्योत सिंग सिद्घू यांची इनिंग यशस्वी ठरली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच भाजपा सोडून काँग्रेसमध्ये  दाखल झालेल्या सिद्धू यांनी पंजाब सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारल्यानंतरही टीव्ही कार्यक्रमांमध्ये भाग घेणे सुरू ठेवले होते. त्याविरोधात चंदिगड येथील वकील एच.सी. अरोडा यांनी जनहित याचिका दाखल करून सिद्धू यांच्या टीव्ही कार्यक्रमामधील सहभागावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मंत्रिपद सांभाळणाऱ्या व्यक्तीला खाजगी व्यवसाय करण्याची परवागी असू नये, असे या याचिकेत म्हटले होते. 
 दरम्यान, सिद्धू यांनी कार्यक्रमांमध्ये काम करण्याबाबत होत असलेल्या आरोपांना धुडकावून लावले होते. दिवसा मी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळेन आणि रात्री टीव्ही शोमध्ये काम करेन, त्यात काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही, मी रात्री काय करतो, याबाबत कुणाला अडचण नसावी,  अशा शब्दात सिद्धू यांनी स्वत:च्या टीव्ही कार्यक्रमातील काम करण्याचा बचाव केला होता.   

Web Title: Work on TV shows: Court rebuked Siddhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.