पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले

By महेश गलांडे | Published: December 13, 2020 04:35 PM2020-12-13T16:35:57+5:302020-12-13T16:38:57+5:30

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय.

Worked in Farsan's company too, mother's eyes watered when her son became an army officer | पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले

पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले

Next
ठळक मुद्देबालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते.

डेहरादून - बिहारच्या आराह येथील बालबंका तिवारी या तरुणाने सैन्य दलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अतिशय खडतर आणि संघर्षमय प्रवास करुन त्यांनी हे यश संपादन केलंय. मुलाच्या अंगावर सैन्य दलाची गणवेश पाहून त्याच्या आई आणि पत्नील अत्यानंद झाला. त्यावेळी, आपल्या मुलाने महाविद्यालयीन जीवनात जगताना केलेल्या कष्टाची आठवणण झाल्याने आई मुन्ना देवी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. बालबंका यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासूनच कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, 50 ते 100 रुपये मिळविण्यासाठी ते दिवसभर म्हणजेच 12 तास काम करत. बालबंका यांचे वडिल शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती. त्यामुळे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना लवकरच कामावर जावे लागले. 12 वी नंतर आरा येथून मी ओडिशातील राऊरकला येथे गेलो. दरम्यानच्या काळात लोखंडाच्या कंपनीत आणि फरसाणच्या कंपनीतही काम केलं. येथून मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं, असं बालबंका यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. कमवा आणि शिका असाच त्यांचा प्रवास राहिला.

यापूर्वी होते सैन्यदलात शिपाई

सैन्य दलात अधिकारी बनण्यापूर्वी ते सैन्य दलातच शिपाई म्हणून भरती झाले होते. तिवारी यांनी 2012 मध्ये भोपाळच्या ईएमई सेंटरमधून आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच परीक्षा पास केली होती. शिपाई पदी रुजू झाल्यानंतरच त्यांनी आर्मी कॅडेट कॉलेजसाठी तयारी सुरू केली. या परीक्षेत 2017 साली त्यांना यश मिळालं. आता सैन्य दलात अधिकारी बनून देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्यानं मला अत्यानंद झाल्याचे ते म्हणतात.

वडिलांनाही अत्यानंद 

आपल्या एका नातेवाईकांकडून बालबंका यांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना गावात मिळणाऱ्या मान-सन्मानामुळे मी प्रभावित झालो होतो. त्यामुळेच, मी सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न वारंवार पाहात होतो, त्यापासून मी कधीही दूर पळालो नाही. आता, माझे वडिल उद्या वर्तमानपत्रात बातमी पाहतील आणि संपूर्ण गावाला माझ्या यशाची गोष्टी सांगतील, असेही बालबंका यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. 
 

Web Title: Worked in Farsan's company too, mother's eyes watered when her son became an army officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.