प्रदुषणरहित फटाक्यांच्या निर्णयाविरोधात कामगारांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:11 AM2018-12-22T05:11:42+5:302018-12-22T05:12:01+5:30
प्रदूषण न करणाऱ्या फटाक्यांची (ग्रीन क्रॅकर्स) निर्मिती करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यामुळे या उद्योगातील लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत
वीरूधूनगर : प्रदूषण न करणाऱ्या फटाक्यांची (ग्रीन क्रॅकर्स) निर्मिती करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यामुळे या उद्योगातील लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत, असे सांगत शिवकाशी व अन्य ठिकाणच्या पाच हजारांहून अधिक कामगारांनी शुक्रवारी सकाळी वीरूधूनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलन केले.
तामिळनाडूतील कामगारांच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या महामार्गापर्यंत गर्दी पांगली गेली आणि वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते. या कामगारांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी हे कामगार करीत होते. वीरूधूनगर, शिवगंगा, मदुराई आणि रामनाथपुरम येथे तीन हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. सीटूचे नेते ए. सौंदराजन म्हणाले की, ग्रीन क्रॅकर काय हेच कोणत्याही एजन्सीला माहीत नाही. (वृत्तसंस्था)