कानळदा आरोग्य केंद्रात कामबंद आंदोलन जि.प.समोर एकवटले कर्मचारी : मारहाण करणार्या सरपंच व कुटुंबीयांवर कारवाईसाठी निदर्शने
By admin | Published: April 5, 2016 12:13 AM2016-04-05T00:13:33+5:302016-04-05T00:13:33+5:30
जळगाव- कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका पुष्पा श्रीधर सोनार यांना मारहाण करणार्या कानळदा येथील सरपंच प्रतिभा भंगाळे, त्यांचे पती विष्णू भंगाळे व मुलगा नीलेश विष्णू भंगाळे यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत कानळदा आरोग्य केंद्रात कामबंद आंदोलन सुरू राहील, असे जि.प.च्या विविध कर्मचारी संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कानळदा येथील आरोग्य सेविका सोनार यांना मारहाणीच्या निषेधार्थ विविध संघटनांनी सोमवारी दुपारी जि.प.समोर निदर्शने केली.
Next
ज गाव- कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका पुष्पा श्रीधर सोनार यांना मारहाण करणार्या कानळदा येथील सरपंच प्रतिभा भंगाळे, त्यांचे पती विष्णू भंगाळे व मुलगा नीलेश विष्णू भंगाळे यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत कानळदा आरोग्य केंद्रात कामबंद आंदोलन सुरू राहील, असे जि.प.च्या विविध कर्मचारी संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कानळदा येथील आरोग्य सेविका सोनार यांना मारहाणीच्या निषेधार्थ विविध संघटनांनी सोमवारी दुपारी जि.प.समोर निदर्शने केली. निदर्शनांमध्ये नर्सिंग संघटना, जि.प.कर्मचारी महासंघ, जि.प. आरोग्य सेविका कर्मचारी संघटना, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटना आदींनी सहभाग घेतला. आरोग्य केंद्रात कामबंदसरपंच भंगाळे, त्यांचा मुलगा नीलेश भंगाळे व पती विष्णू भंगाळे यांना अटक होणार नाही तोपर्यंत जि.प.चे कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद राहील. आरोग्यसेेविका काम करणार नाहीत, असेही संघटनांनी म्हटले आहे. संरक्षण मिळावेआरोग्यसेविका सोनार या शासकीय कामानिमित्त सरपंच भंगाळे यांच्याकडे गेल्या, त्या वेळेस त्यांना सरपंच प्रतिभा भंगाळे, नीलेश भंगाळे व विष्णू भंगाळे यांनी मारहाण केली. या दहशतीच्या वातावरणात आरोग्य केंद्रात कुणी काम करणार नाही. आरोग्यसेविका सोनार यांना संरक्षण पुरविले जावे. तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून सरपंच भंगाळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निदर्शने करताना कर्मचारी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा सुर्वे, नर्सिंग संघटनेच्या इंदिरा जाधव, अजय चौधरी, मंगेश बाविस्कर, मंदाकिनी ढाके, ज्योती भंगाळे आदी उपस्थित होते.