कामाच्या मोबदल्यासाठी मजुरांच्या विनवण्या

By Admin | Published: September 10, 2014 11:59 PM2014-09-10T23:59:03+5:302014-09-11T00:00:27+5:30

हिंगोली : ४१ मजुरांची मजुरीसाठी वाट पाहवी लागली.

Workers' Connection for Change of Work | कामाच्या मोबदल्यासाठी मजुरांच्या विनवण्या

कामाच्या मोबदल्यासाठी मजुरांच्या विनवण्या

googlenewsNext

हिंगोली : तळहातावर पोट असणाऱ्या ४१ मजुरांची जिल्ह्यातील कृषी चिकित्सालयाच्या जमिनीवर घाम गाळला पण मजुरीसाठी वाट पाहवी लागली. दिवसरात्र काम करूनही मोबदल्यासाठी दोन-दोन वर्षे कृषी विभागाचे खेटे घालावे लागणार असतील तर मजुरांच्या घरी चुली कशा पेटतात, हे त्यांनाचा ठाऊक. एवढ्यावरच न थांबता उपोषण करूनही १९ लाखांची मजुरी थकल्याने मजुरांचा कामचुकारपणा वाढला. परिणामी, जमिनी पडीक होण्याची वेळ आली असतानाही अधिकाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नाही.
जिल्ह्यात पाच ठिकाणी चिकित्सालयाची १२१ हेक्टर जमीन ४१ मजुरांच्या जिवावर कसली जाते. एकीकडे ग्रामीण भागात एक शेतकरी किमान ५ हेक्टरची सहज वहिती करतो. दुससरीकडे सर्व यंत्रणा आणि भांडवल असतानाही ३०० एकरासाठी ४१ मजूर अपुरे पडतात. सर्वच ठिकाणी अशी अवस्था असल्याने रोजंदारीवर मजुरांना कामासाठी बोलविले जाते. कितीही मजूर लावले तरी काम दिसत नाही. कामाच्या नावाने बोंबाबोब आहे. गावातील शेतमालक दिवसभर पाठीमागे राहूनही कामचुकारपणा करतात. येथे तर मजूरच मालक असतात. दिवसाच्या कामाला दोन दिवस लावतात. परिणामी मजुरी वाढत जाते. पण झालेल्या कमाचा मोबदलाही वेळेवर मिळत नाही. मागील कित्येक महिन्यांपासून या कामगारांची मजुरी थकली. त्यांना मोबदल्यासाठी उपोषण करावे लागले.
सात महिन्यांपूर्वी मजुरांच्या वेतनाची मागणी लातूर येथील विभागीय कार्यालयास करण्यात आली. त्यावर कोणताही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. आजघडीला हिंगोलीतील ३ नोंदणीकृत मजूर आहे. दुसरीकडे वसमत १६, आखाडा बाळापूर ८, बासंबा ७ आणि गोळेगावात ७ मजुर कार्यरत आहेत. एकूण ४१ जण वेतनाच्या प्रतीक्षेत असताना आधिकारी पाठपुरावा सुरू असल्याचे थातूरमातूर उत्तर देतात. सहा महिन्यांपासून कुठल्याही स्वरूपाचा पाठपुरावा केलेला नाही. यंदाच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात तेवढे पत्र गेलेले आहे.
वेतनाअभावी मजूर काम करीत नाहीत. केवळ ‘दिन जाओ, पगार आओ’ एवढेच धोरण त्यांनी अवलंबिले. परिणामी, पिकांमध्ये तण वाढल्याने यंदाचे पिकेही हातचे निघून जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
दोन महिन्यांपूर्वी लातूर येथील विभागीय कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी मंत्री, सचिव यांच्याशी बोलून तत्काळ वेतन देण्याचे आश्वासनही वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाले होते. प्रत्यक्षात वेतन मिळाले नसल्यामुळे आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.
- उद्धव शिंदे, संयुक्त सचिव, लाल निशान लेनीनवादी मराठवाडा श्रमिक संघटना
अनेक दिवसांपासून मजुरी थकली आहे. त्या मजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
-यू. जी. शिवणगावकर,
उपविभागीय कृषी अधिकारी
कृषी चिकित्सालयाची जमीन
ठिकाण जमीन हेक्टर मजूर हिंगोली ११.८० ३
बासंबा ३५.५० ७
वसमत २४.८० १६
गोळेगाव ५ ७
बाळापूर ४४.५० ८
एकूण १२१.६ ४१

Web Title: Workers' Connection for Change of Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.