गाळेप्रकरणी १७ रोजी कामकाज उच्च न्यायालय : चार याचिकांवर एकत्रित कामकाज

By Admin | Published: December 10, 2015 11:57 PM2015-12-10T23:57:39+5:302015-12-10T23:57:39+5:30

जळगाव : मनपाच्या मार्केटमधील गाळ्यांसंदर्भात चार वेगवेगळ्या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी एकत्रित कामकाज झाले. मात्र सरकारी वकील नसल्याने याप्रकरणी पुढील कामकाज १७ रोजी होईल.

Working Court on 17th of the proceedings: Combined work on four petitions | गाळेप्रकरणी १७ रोजी कामकाज उच्च न्यायालय : चार याचिकांवर एकत्रित कामकाज

गाळेप्रकरणी १७ रोजी कामकाज उच्च न्यायालय : चार याचिकांवर एकत्रित कामकाज

googlenewsNext
गाव : मनपाच्या मार्केटमधील गाळ्यांसंदर्भात चार वेगवेगळ्या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी एकत्रित कामकाज झाले. मात्र सरकारी वकील नसल्याने याप्रकरणी पुढील कामकाज १७ रोजी होईल.
मनपाच्या गाळे प्रकरणी उपमहापौर सुनील महाजन, तसेच कॉंग्रेसचे डॉ.राधेश्याम चौधरी, राहूल तोडा, हिराराल नथ्थू पाटील यांनी स्वतंत्रपणे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी गुरुवारी न्या.आर.एम. बोर्डे व न्या.चिमा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होती. मात्र शासनाचे वकील गिरासे हे वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहू न शकल्याने याप्रकरणी आता १७ डिसेंबर रोजी कामकाज होईल. याप्रकरणात मनपातर्फे ॲड.एस.एस.पाटील, ॲड.पी.आर. पाटील काम पहात आहेत.
-------इन्फो----
काय आहेत मागण्या?
वादी राहुल तोडा यांनी १३५ क्रमांकाच्या ठरावावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. ४० नंबरच्या ठरावावर निर्णय घ्यावा, ज्या गाळ्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत, त्यांना नोटीस द्याव्यात, २०१२ पासून थकीत असलेले भाडे, कर वसूल करावे, निर्णय झालेले गाळे ताब्यात घ्यावेत आदी मागण्या केल्या आहेत.
सुनील महाजन यांनी मनपाने ९ गाळे सील केले होते. ते शासनाने उच्च न्यायालयाचे आदेशानंतरही उघडायला लावले. ते बेकायदेशीर असल्याच्या मुद्यावर दाद मागितली आहे.
हिराराल नथ्थू पाटील यांनी उच्च न्यायालयाने आदेश असतानाही शासनाने गाळ्यांचे सील उघडायला लावले. हा कोर्टाचा अवमान आहे. जो निर्णय झाला.त्याप्रमाणे गाळे मनपाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी केली आहे.
डॉ.राधेश्याम चौधरी यांनी १३५च्या ठरावावर शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Working Court on 17th of the proceedings: Combined work on four petitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.