Covaxin Booster Dose: कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांसाठी महत्वाचे! बुस्टर डोस मिळेल, पण इंजेक्शनद्वारे नाही,तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:29 PM2021-08-16T14:29:39+5:302021-08-16T14:30:31+5:30

Covaxin nasal booster dose: कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ कृष्‍णा एल्‍ला यांनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नेझल व्हॅक्सिन देण्याबाबत तयारी सुरु असल्याचे संकेत दिले आहेत.

Working on nasal vaccine as booster dose of Covaxin, says Bharat Biotech CMD DR. Krushna Ella hints | Covaxin Booster Dose: कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांसाठी महत्वाचे! बुस्टर डोस मिळेल, पण इंजेक्शनद्वारे नाही,तयारी सुरु

Covaxin Booster Dose: कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांसाठी महत्वाचे! बुस्टर डोस मिळेल, पण इंजेक्शनद्वारे नाही,तयारी सुरु

Next

नवी दिल्ली : कोरोनाची (corona Vaccine) कोणतीही लस घेतली तरी त्या लोकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. भारतात सध्या कोव्हिशिल्ड (Covishield) , कोव्हॅक्सिन (Covaxin), स्पुतनिक आदी लसी मिळत आहेत. या सर्वच लसींचा बुस्टर डोस (Booster dose) घेण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जगातील सर्वात महागडी ठरलेली कोव्हॅक्सिन लस बनविणाऱ्या भारत बायोटेकने बुस्टर डोसची तयारी सुरु केली आहे. (Bharat Biotech preparations on Covaxin booster dose as nasal vaccine.)

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ कृष्‍णा एल्‍ला यांनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नेझल व्हॅक्सिन देण्याबाबत तयारी सुरु असल्याचे संकेत दिले आहेत. दोन डोस घेतले की, तिसऱ्या बुस्टर डोसची गरज आहे. यावर नेझल स्प्रे बुस्टर डोससारखे काम करेल आणि संकमनापासून वाचवेल, असे एल्ला यांनी टाईम्स नाऊच्या एका कार्यक्रमात सांगितले. कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस देऊन लोकांचा इम्युनिटी रिस्पॉन्स टाईम वाढविण्याबाबतचा अखेरचा निर्णय हा सरकारचा असेल असेही ते म्हणाले. 

भारत बायोटेक कोव्हॅक्सिन नंतर नेझल स्प्रेच्या कॉम्बिनेशनवर काम करत आहे. कोव्हॅक्सिन प्रतिकार शक्ती वाढवेल आणि नेझल त्याला बुस्ट करेल. नेझल स्प्रे तीन प्रकारचे इम्युन रिस्पॉन्स तयार करेल. IGG, IGA आणि म्‍यूकोजल इम्‍युनिटी. या तिन्ही शक्ती खूप ताकदवर आहेत, आणि लोकांना संक्रमणापासून वाचवितात. 

जर कोव्हॅक्सिनची लस डेल्टा व्हेरिअंटविरोधात प्रभावी आढळली तर तिसऱ्या डोसची गरज सरकार ठरवेल. आम्ही एका बुस्टर डोसची चाचणी घेतली आहे. त्याच्या परिणामांची वाट पाहत आहोत. जर बुस्टर डोसची मागणी झाली तर लसीचा तुटवडा होईल, अशा जटील परिस्थितीत कंपन्या आहेत. असे ते म्हणाले. 

नेझल व्हॅक्सिन उपयुक्त ठरले तर त्याचे उत्पादन दुप्पट केले जाईल. सध्या भारत बायोटेक महिन्याला 2 ते अडीच कोटी डोस पुरवत आहे. पुढील काही महिन्यांत हे उत्पादन 5.8 कोटींवर जाईल. 

Web Title: Working on nasal vaccine as booster dose of Covaxin, says Bharat Biotech CMD DR. Krushna Ella hints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.