कार्यशाळा

By admin | Published: April 5, 2016 12:15 AM2016-04-05T00:15:45+5:302016-04-05T00:15:45+5:30

हॅलो १ साठी...

Workshop | कार्यशाळा

कार्यशाळा

Next
लो १ साठी...
जळगाव- युनिक अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शक अशा मोफत कार्यशाळेचे आयोजन ५ रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात करण्यात येेणार आहे. त्यात अकॅडमीच्या महाराष्ट्र वार्षिकी या अंकाचे प्रकाशन जैन उद्योग समूहाचेे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते केले जाईल. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
गणगौर कार्यक्रम
जळगाव- माहेश्वरी संखी मंडळातर्फे ६ रोजी सकाळी १०.३० वाजता गणगौर कार्यक्रम पांझरापोळ येथे आयोजिण्यात आला आहे. मंडळाच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलेे आहे.
साहित्य क˜ा
जळगाव- समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे मी वाचलेले पुस्तक या विषयावर साहित्य चर्चेचे आयोजन भगीरथ स्कूलमध्ये करण्यात आले होते. त्यात साहित्यिक भास्कर चव्हाण, पुष्पलता कोळी, निवृत्तीनाथ कोळी, गोविंद पाटील, बापुराव वाकलकर आदींनी सहभाग घेतला.
स्वागत कार्यक्रम
जळगाव- हिंदूू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याला ८ रोजी सकाळी सकाळी सहा वाजता संस्कार भारतीतर्फे गुढीचे पूजन केले जाणार आहे. महापालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम होईल. पहाट गीतांचा कार्यक्रमही होईल. हा कार्यक्रम डॉ.शंकर पुणतांबेकर यांना समर्पित केला जाणार आहे. नवर्वाचे स्वागत करणारी गीते सादर केली जातील. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.