पडसाळी येथे श्रमसंस्कार शिबीर

By admin | Published: April 4, 2015 01:55 AM2015-04-04T01:55:04+5:302015-04-04T01:55:04+5:30

फोटो- ०३ वडाळा..

Workshop Camp at Padasali | पडसाळी येथे श्रमसंस्कार शिबीर

पडसाळी येथे श्रमसंस्कार शिबीर

Next
टो- ०३ वडाळा..
सोलापूर :
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान अंतर्गत लोकमंगल कृषी व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत पडसाळी येथे श्रमसंस्कार शिबीर घेण्यात आले.
स्वाईन प्लू जनजागृती, ग्रामस्वच्छता, जनावरांचे लसीकरण, शौचालयाचे महत्त्व, आरोग्य शिबीर घेण्यात आले. जनावरांना येणार्‍या रोगांची शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात आली. गाय, म्हैस, बैल, शेळ्यांना लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच महादेव भोसले, उत्तरेश्वर शेळके, पांडुरंग ढेकणे, नानासाहेब शिरसट, पशुसंवर्धन अधिकारी आर.यु. जाधव, डॉ. विजय मस्के, संतोष साठे, अंबादास कांबळे, विष्णू गोडसे, अंजली सांगोलकर आदी उपस्थित होते. विजय नरोटे, अरुणा सुतार, प्रा. विनायक सुतार, लक्ष्मण मिसाळ, सागर महाजन आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
फोटो- पडसाळी येथे लोकमंगल महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थी़

Web Title: Workshop Camp at Padasali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.