विश्व संस्कृती महोत्सव वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: March 7, 2016 11:10 PM2016-03-07T23:10:01+5:302016-03-07T23:10:01+5:30
प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेतर्फे येथील यमुना नदीच्या किनारी येत्या ११ मार्चला आयोजित विश्व संस्कृती महोत्सवावरील वादावर आज
नवी दिल्ली: प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेतर्फे येथील यमुना नदीच्या किनारी येत्या ११ मार्चला आयोजित विश्व संस्कृती महोत्सवावरील वादावर आज मंगळवारी राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) आपला निर्णय देणार आहे. परंतु तत्पूर्वी संस्थेला आणखी एक धक्का बसला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार नाहीत.
या कार्यक्रमासाठी ३५ लाख लोकांच्या येथे येण्याने नदीच्या पर्यावरणावर सुमारे २ लाख १० हजार टन एवढा भार पडणार आहे. त्यामुळे आम्ही पर्यावरण लवादाकडे हा कार्यक्रम रद्द करण्याची याचिका केली असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते आनंद आर्य यांनी सांगितले.
श्री श्री रविशंकर यांनी मात्र यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. ज्या कामासाठी पुरस्कार मिळायला हवा होता त्यासाठी आम्हाला न्यायालयात खेचण्यात येत आहे. कार्यक्रम संपल्यावर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन आम्ही दिले असून ते पूर्ण करू, असेही श्री श्रींनी स्पष्ट केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)