संतापजनक! WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे; चीनकडे रोख

By देवेश फडके | Published: January 10, 2021 01:30 PM2021-01-10T13:30:30+5:302021-01-10T13:32:24+5:30

जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जारी करण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहे. यामागे चीनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

world health organisation map segregated jammu kashmir and ladakh from india | संतापजनक! WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे; चीनकडे रोख

संतापजनक! WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे; चीनकडे रोख

Next
ठळक मुद्देWHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाखचा भूभाग भारतापासून वेगळाब्रिटनमधील प्रवासी भारतीयांचा तीव्र आक्षेपWHO च्या नकाशामागे चीनचा हात असल्याचा दावा

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जारी करण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहे. हा रंगीत नकाशा जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या या नकाशात भारतीय भूभाग हा गडद निळ्या रंगात दर्शवण्यात आलेला आहे. तर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग राखाडी रंगात दाखवण्यात आला आहे. WHO कडून जारी करण्यात आलेल्या नकाशावर ब्रिटनधील प्रवासी भारतीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

‘Covid-19 Scenario Dashboard’ यामध्ये हा नकाशा देण्यात आला असून, जागतिक स्तरावर कोणत्या देशात कोरोनाचे किती रुग्ण आढळून आले आहेत आणि कोरोनामुळे कोणत्या देशात किती मृत्यू झाले आहेत, याची माहिती या नकाशाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दरम्यान, 'यूनायटेड नेशन'च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन संघटनेकडून केले जाते आणि त्याप्रमाणेच नकाशा पाहिला, समजला आणि दाखवला जातो, असे स्पष्टीकरण WHO कडून देण्यात आले आहे.

लंडनधील प्रवासी भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही बाब सर्वप्रथम आली. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा नकाशा शेअर करण्यात आला होता. हा नकाशा सर्वप्रथम पाहिला तेव्हा जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भूभाग भारतापासून वेगळा दाखवल्यामुळे ही हैराण झालो. यामागे चीनचा हात असू शकेल. कारण चीनकडून WHO ला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली जाते, असा दावा पंकज यांच्याकडून करण्यात आला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. 

'प्रवासी समूह'च्या प्रमुख नंदिनी सिंह यांनीही यासंदर्भात तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कोरोना संकट काळात केलेल्या कामाबाबात भारताचे आभार मानले गेले पाहिजेत. याउलट, भारताला नुकसान पोहोचवण्याचे काम WHO कडून केले जात आहे. या नकाशाबाबत माफी मागितली गेली पाहिजे, अशी मागणी नंदिनी सिंह यांनी केली. 

Web Title: world health organisation map segregated jammu kashmir and ladakh from india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.