भारतातील 'या' ठिकाणी बनणारी जगातील सर्वात वजनदार अन् मोठी घंटा, वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:55 PM2022-02-08T18:55:26+5:302022-02-08T18:58:38+5:30

भारतातील ही घंटा तब्बल ३ जिनिअस वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. या घंटेचे वजन आहे तब्बल ८२ हजार किलो. चीनची घंटा फक्त १०१ किलोची आहे तर मॉस्कोची २०० किलोची.

world largest bell to be built in kota | भारतातील 'या' ठिकाणी बनणारी जगातील सर्वात वजनदार अन् मोठी घंटा, वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत

भारतातील 'या' ठिकाणी बनणारी जगातील सर्वात वजनदार अन् मोठी घंटा, वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत

googlenewsNext

तुम्ही चीनच्या बिग बेल टेंपल बद्दल ऐकंल असेल. मॉस्कोच्या सर्वात वजनदार घंटे बद्दल ऐकलं असेल पण या घंटा आता भारतातील एका घंटेसमोर फिक्या पडणार आहेत. भारतातील ही घंटा तब्बल ३ जिनिअस वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. या घंटेचे वजन आहे तब्बल ८२ हजार किलो. चीनची घंटा फक्त १०१ किलोची आहे तर मॉस्कोची २०० किलोची.

राजस्थानच्या कोटामध्ये चंबल रिवर फ्रंट येथे जगातील सर्वात वजनदार घंटेची निर्मिती केली जाणार आहे. या घंटेची निर्मिती भारतीचे स्टील मॅन म्हणून ओळखले जाणारे इंजिनिअर देवेंद्र कुमार आर्य हे करत आहेत. त्यांनी सांगितले की, घंटेचे वजन आधी ५७ हजार किलो घोषित करण्यात आले होते पण त्यात घंटेसाठी लागणाऱ्या साखळीचे वजन मोजण्यात आले नव्हते पण आता तेही यात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या घंटेचे एकुण वजन तब्बल ८२ हजार किलो झाले आहे.

या घंटेचे आर्किटेक अनूप भरतरिया यांनी सांगितले की, ही वजनदार घंटा पडून नये यासाठी अत्यंत मजबुत अशी साखळी तयार करण्यात आली आहे. तसेच या साखळीचे अन् घंटेचे डिझाईन अत्यंत सुरेख आहे. मॉस्को येथील घंटा साखळी नसल्यामुळे तुटली होती. पेंडुलममुळे घंटा पडण्याची शक्यता वाढते. घंटेसह पेंडुलम व्यवस्थित राहावे यासाठी ही मजबूत साखळी तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

इंजिनिअर देवेंद्र कुमार यांनी दावा केला आहे की ही घंटा अत्यंत मजबुत आहे. घंटेची साखळी हा त्याचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे घंटा पडण्याची शक्यात शुन्य टक्के आहे. जर साखळी नसती तर ही घंटा पडण्याची शक्यता होती. या घंटेमुळे कोटा या स्थानाला जागतिक प्रसिद्धी मिळेल.

Web Title: world largest bell to be built in kota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.