जागतिक लोकसंख्या दिन : २०२७ मध्ये लोकसंख्येत भारत चीनलाही मागे टाकेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:31 AM2020-07-11T06:31:36+5:302020-07-11T06:34:20+5:30
२०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई: संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणुचा उद्रेक झाला असून या संसर्गजन्य रोगामुळे दर तासाला २७० जण मृत्यूमुखी पडत आहेत. या महाभंयकर साथरोगावर प्रभावी औषध अथवा प्रतिबंधक लस वेळीच शोधली गेली नाही, तर पुढील वर्षाच्या आरंभापर्यंत जगाची किमान २० ते ३६ टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित झालेली असेल. दरम्यान, आज जागतिक लोकसंख्या दिनी संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०२७ मध्ये भारतचीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरण्याची शक्यता आहे.
आशियाई देश सर्वांत तरुण
युरोप, अमेरिकादी विकसित देशांत ४० दशलक्ष लोक ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असून दिवसेंदिवस या देशांमध्ये प्रजनन दर कमी होत आहे.
तर दुसरीकडे आशिया खंडातील लोकांचे सध्याचे सरासरी वय ३१ असून २१०० मध्ये ते ४२ होईल.
सध्या आशिया खंडातील देशांची लोकसंख्या ४ अब्ज ६ कोटी असून २०५० मध्ये ती साडेपाच अब्ज होण्याचा अंदाज आहे.
सध्या जपान, दक्षिण कोरियाची लोकसंख्या वाढ थांबली असून २०५० नंतर चीनची लोकसंख्या वाढ कमी होईल.
भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये
135 कोटी लोकसंख्या भारतात. जगात दुसऱ्या क्रमांक जगातील प्रत्येक सहा जणांपैकी
१ जण भारतीय असतो.
17.85% लोक जगाच्या लोकसंख्येपैकी भारतात राहातात.
2050 सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६५ कोटी होण्याचा अंदाज आहे.
भारतात दरवर्षी आॅस्ट्रेलिया देशाच्या लोकसंख्येएवढे लोक जन्माला येतात.
4.45 कोटी भारतात विद्यार्थी असून ही संख्या रशिया, पाकिस्तान, इंडोनेशिया या तीन देशांच्या लोकसंख्ये एवढी आहे.
2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी असून ती अमेरिका, पाकिस्तान, इंडोनेशिया, ब्राझिल, बांगलादेश आणि जापानच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल
7.6 अब्ज जगाची लोकसंख्या
1.35 अब्ज । भारत
1.43 अब्ज । चीन
2024 पर्यंत भारत व चीनची लोकसंख्या जवळजवळ समान असेल.
2027मध्येच लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा चीनला मागे टाकेल
2030पर्यंत भारताची लोकसंख्या
१.५१ अब्जांपर्यंत पोहोचेल.
2027नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेहून अधिक असेल!