विश्वविक्रमासाठी 'तो' बोलणार नॉनस्टॉप ७५ तास
By Admin | Published: June 16, 2016 01:10 PM2016-06-16T13:10:13+5:302016-06-16T15:27:56+5:30
गुजरातमधील सूरत येथे रहाणारे ४५ वर्षीय अश्विन सूदानी यांना बोलण्यामध्ये विश्वविक्रम रचायचा आहे.
ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. १६ - गुजरातमधील सूरत येथे रहाणारे ४५ वर्षीय अश्विन सूदानी यांना बोलण्यामध्ये विश्वविक्रम रचायचा आहे. त्यासाठी अश्विन आजपासून सलग ७५ तास न थांबता बोलणार आहेत. ते ७५ तासात ७५ वेगवेगळया विषयांवर बोलणार आहेत. सलग ७५ तास बोलत रहाण्यात ते यशस्वी ठरले तर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद होईल.
या प्रयत्नात ते तरुणांना प्रेरणा मिळेल, महिला सबलीकरण आणि कौटुंबिक मुल्य या विषयावर बोलणार आहेत. सध्याच्या दिवसांमध्ये तरुणांचा संयम कमी होत चालला आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळया समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या मोठया प्रमाणावर तरुण आत्महत्या करत आहेत. अशा भरकटलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नॉनस्टॉप बोलत रहण्याचा निर्णय घेतला असा सूदानी यांनी सांगितले.
देशाप्रती कर्तव्य, व्यसनमुक्त तरुणाई, शिक्षण आणि आयुष्याचे मुल्य या चार कारणांसाठी अश्विन सूदानी यांनी नॉनस्टॉप बोलण्याचा निर्णय घेतला आहे.