गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'; मोदींकडून अभिनंदन अन् सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:04 PM2024-01-01T19:04:52+5:302024-01-01T19:16:25+5:30

गुजरातमध्ये सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे अभिनंदन केले

World Record of Surya Namaskar in Gujarat; Narendra Modi congratulated | गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'; मोदींकडून अभिनंदन अन् सल्ला

गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'; मोदींकडून अभिनंदन अन् सल्ला

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: योगासने आणि सूर्यनमस्कार करुन शारिरीक तंदुरुस्त जपतात. मोदींच्या प्रयत्नातूनच जगभरात भारतीय योगाभ्यास आणि योगासने पोहोचली. त्यामुळेच, जागतिक योग दिनही साजरा होऊ लागला. भारतीय संस्कृती आणि परंपरेत योगासने आणि योगविद्येला अधिक महत्त्व आहे. त्यात, सूर्यनमस्काराचेही विशेष महत्व आहे. याच सूर्यनमस्काराच्या सामूहिक कृतीतून गुजरातने आज गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपलं नावं केलंय. एकाचवेळी १०८ ठिकाणी हा सूर्यनमस्कार घालण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा विक्रम गुजरातने केला आहे. 

गुजरातमध्ये सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे अभिनंदन केले. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा, असे आवाहनही मोदींनी केले.


पंतप्रधानांनी ट्विटरवरुन काही फोटो शेअर करत या समाज माध्यमावर पोस्ट केले आहेत. त्यासोबत म्हटले की, "गुजरातने २०२४ चे स्वागत एका उल्लेखनीय उपक्रमाने केले, तो म्हणजे - सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित करणे! आपल्या सर्वांना माहीत आहेच की, १०८ क्रमांकाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या स्थळांमध्ये मोढेरा सूर्य मंदीराचाही समावेश आहे. येथील कार्यक्रमात अनेक लोक सामील झाले होते. योग आणि आपल्या सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी वचनबद्धतेचा हाच खरा पुरावा आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की मौलिक फायदे असलेल्या सूर्यनमस्काराला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.”, असे ट्विट मोदींनी केले आहे. 
 

Web Title: World Record of Surya Namaskar in Gujarat; Narendra Modi congratulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.