स्मरणशक्तीचा वर्ल्ड रेकॉर्ड
By Admin | Published: October 6, 2015 03:53 AM2015-10-06T03:53:14+5:302015-10-06T03:53:14+5:30
अचाट स्मरणशक्तीने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या राजस्थानमधील राजवीर मीणा या २१ वर्षाच्या विद्यार्थ्यांने भल्याभल्यांना थक्क केले. ९ तास आणि २७ मिनिटात पायचे
कोटा : अचाट स्मरणशक्तीने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या राजस्थानमधील राजवीर मीणा या २१ वर्षाच्या विद्यार्थ्यांने भल्याभल्यांना थक्क केले. ९ तास आणि २७ मिनिटात पायचे दशांशानंतरचे ७० हजार अंक क्रमवार मुखोद्गत म्हणत त्याने १० वर्षापूर्वीचा चीनी विद्यार्थ्याचा विक्रम मोडला.
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्णातील मोहोचा या छोट्याशा गावातील राजवीरला १ आॅक्टोबर रोजी ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड फॉर मेमोरी’ प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. एवढे अंक अचूक आणि तोंडीपाठ सांगण्यासाठी जवळपास १० तास लागतात. २००५ मध्ये चीनच्या लू चाओ याने पायचे दशांशानंतरचे ६७,८९० अंक २४ तास आणि ७ मिनिटांत सांगत हा विक्रम केला होता.
राजवीरने २१ मार्च २०१५ रोजी हा विक्रम मोडीत काढला. व्हीआय युनिव्हर्सिटी (वेल्लोर) येथे हे अंक तोंडीपाठ म्हणून दा्नखवितांना डोळ्यांवर पट्टी बांधली होती, अशी माहिती गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटने दिली आहे.