हा संसार म्हणजे एक रंगभूमी-आमोणकर

By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:08+5:302015-05-05T01:21:08+5:30

सावर्डे : माणूस जगाच्या पाठीवरचा नट असतो. हा संसार म्हणजे एक रंगभूमी हे शेक्सपिअरचे विधान तंतोतंत खरे आहे, असे मत गोमंतकीय नटश्रेष्ठ रविंद्र आमोणकर यांनी सावर्डे येथील घैसास सांस्कृतिक हॉलात आनंदी ग्रामीण वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित लेखक तुमच्या भेटीस या कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की रणभूमीवर आपण कोणतेही कसलेही काम करु शकतो. दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार निवेदक पडद्यामागील काम सुध्दा. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आनंदी गार्डन्सचा एक चांगला उपक्रम आहंे. सावर्डे कुडचडेत हॅम्लेट सारख्र्या नाटकाच्या माध्यमातून शेक्सपिअरसारखा जागतिक किर्तीचा लेखक त्यानी जाणवला, अनुभवला आणि त्याची नाट्यकृती सादर करण्याचे जे धाडस केले त्यासाठी आणि पन्नास वर्षापूर्वी त्यांच्या इंग्रजी व मराठीत प्रयोग करणे म्हणजे त्या युवक युवतीना कलाक

This world is a stage-breaker | हा संसार म्हणजे एक रंगभूमी-आमोणकर

हा संसार म्हणजे एक रंगभूमी-आमोणकर

Next
वर्डे : माणूस जगाच्या पाठीवरचा नट असतो. हा संसार म्हणजे एक रंगभूमी हे शेक्सपिअरचे विधान तंतोतंत खरे आहे, असे मत गोमंतकीय नटश्रेष्ठ रविंद्र आमोणकर यांनी सावर्डे येथील घैसास सांस्कृतिक हॉलात आनंदी ग्रामीण वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित लेखक तुमच्या भेटीस या कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की रणभूमीवर आपण कोणतेही कसलेही काम करु शकतो. दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार निवेदक पडद्यामागील काम सुध्दा. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आनंदी गार्डन्सचा एक चांगला उपक्रम आहंे. सावर्डे कुडचडेत हॅम्लेट सारख्र्या नाटकाच्या माध्यमातून शेक्सपिअरसारखा जागतिक किर्तीचा लेखक त्यानी जाणवला, अनुभवला आणि त्याची नाट्यकृती सादर करण्याचे जे धाडस केले त्यासाठी आणि पन्नास वर्षापूर्वी त्यांच्या इंग्रजी व मराठीत प्रयोग करणे म्हणजे त्या युवक युवतीना कलाकारांना हे महान होते म्हणून त्याना मी दाद देतो. नाट्यकलाकार सुहास सावर्डेकरनी नाटक विषयावरील चर्चेत भाग घेताना असे सांगितले की कुठलीही भूमिका पात्राच्या आकृ ती, पा्रकृती, हावभाव, योग्यता यावरुन ठरविली जाते. आपल्याला येथील ज्येष्ठ कलाकार विठठलमाम यानी स्त्री भूमिका करण्यास पहिल्यांदा निमंत्रित केले. पंतांची सून नाटकातून माझा स्त्री भूमीकेतून रंगभूमीवर पहिला प्रवेश झाला. आणि मी केलेल्या आणि करीत असलेल्या स्त्री भूमिकामुळेच रंगमंचावर आज माझी एक उत्कृष्ट नटम्हणून प्रचिती झालेली आहे. त्यानी काही उदाहरणे देताना सांगितले की, अश्रुंची झाली फुले मधील लाल्या - डॉ. काशिनाथ घाणेकर, एकच प्याला मधील तळीराम - शरद तळवलकर, ही पात्रे म्हणजे त्याच्या भूमिकामुळे नावलौकिक झाले आहेत. तसेच आपले नाव स्त्री भूमिकामुळे गोव्यात प्रसिध्द झाले आहे.डॉ. रेवणसिध्द नाईक यानी सांगितले की ज्या व्यक्ती समाजोपयोगी व्यवसाय करतात त्यानी नकारात्मक भूमिका करु नये त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी उडेलकर यानी केले. आनंदी नाईंक यानी स्वागत केले तर ज्ञानेश्वर नाईक यानी आभार मानले.

(प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म : 0305-टअफ-26
कॅप्शन: लेखक तुमच्या भेटीस कार्यक्रमात बोलताना नटवर्य रविंद्र आमोणकर, सुहास सावर्डेकर, डॉ. रेवणसिध्द नाईक व आनंदी नाईक.

Web Title: This world is a stage-breaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.