World Top Polluted Cities 2022: जगातील टॉप 20 प्रदुषित शहरांमध्ये भारततील 15 शहरांचा समावेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 07:13 PM2023-06-06T19:13:24+5:302023-06-06T19:13:33+5:30

भिवंडी भारतातील सर्वात प्रदुषित शहर, तर दिल्लीचा दुसरा क्रमांक.

World Top Polluted Cities 2022: 15 Indian cities among top 20 polluted cities in the world | World Top Polluted Cities 2022: जगातील टॉप 20 प्रदुषित शहरांमध्ये भारततील 15 शहरांचा समावेश...

World Top Polluted Cities 2022: जगातील टॉप 20 प्रदुषित शहरांमध्ये भारततील 15 शहरांचा समावेश...

googlenewsNext

World Top Polluted Cities 2022: गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक शहरांमध्ये वातावरणात दुषित होत चालले आहे. काही शहरांमध्ये श्वास घेणे ही कठीण झाले आहे. गेल्या वर्षीही अनेक शहरांची हवा अत्यंत विषारी झाली होती. जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 15 शहरे भारतातील आहेत यावरून याचा अंदाज लावता येईल. 

IQAir या स्विस वायु गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनीने वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात असे सांगण्यात आले आहे की, जगातील टॉप 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 38 शहरे भारतातील आहेत. या रिपोर्टमधून देशातील परिस्थिती कळेल. दरम्यान, जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये नंबर एकला पाकिस्तानातील लाहोर आहे. यानंतर चीनच्या होटनचा दुसरा क्रमांक लागतो, तर भारतातील भिवंडी क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप 20 सर्वाधिक प्रदूषित शहरे

  1. लाहोर, पाकिस्तान
  2. होटन, चीन
  3. भिवंडी, भारत
  4. दिल्ली, भारत
  5. पेशावर, पाकिस्तान
  6. दरभंगा, भारत
  7. आसोपूर, भारत
  8. नजमेना, चाड
  9. नवी दिल्ली, भारत
  10. पाटणा, भारत
  11. गाझियाबाद, भारत
  12. धरुहेरा, भारत
  13. बगदाद, इराक
  14. छप्रा, भारत
  15. मुझफ्फरनगर, भारत
  16. फैसलाबाद, भारत
  17. ग्रेटर नोएडा, भारत
  18. बहादूरगड, भारत
  19. फरीदाबाद, भारत
  20. मुझफ्फरपूर, भारत

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भिवंडी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक येतो. देशाची राजधानी असल्याने सर्वांचे लक्ष या शहराकडे असते. दिवाळीनंतर प्रदूषण इतके वाढते की, लोक मास्कशिवाय घराबाहेर पडणे टाळतात. 

Web Title: World Top Polluted Cities 2022: 15 Indian cities among top 20 polluted cities in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.