खर्चापेक्षा विश्वासाने जागतिक व्यापार व्हावा; मोदींचा चीनवरून जगाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 10:54 PM2020-09-03T22:54:29+5:302020-09-03T22:54:52+5:30

भारत एक असा देश आहे ज्याच्यामध्ये हे सारे गुण आहेत. भारत परदेशी गुंतवणुकदारांसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे. अमेरिकेसह आखाती देश आमच्यावर विश्वास ठेवतात, असे मोदी म्हणाले.

World trade should be about trust rather than cost; Modi's warning to the world from China | खर्चापेक्षा विश्वासाने जागतिक व्यापार व्हावा; मोदींचा चीनवरून जगाला इशारा

खर्चापेक्षा विश्वासाने जागतिक व्यापार व्हावा; मोदींचा चीनवरून जगाला इशारा

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका- इंडिया स्ट्रैटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या तिसऱ्या वार्षिक परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीने जगाला हे सांगितले आहे की ग्लोबल सप्लाय चेन केवळ खर्च पाहून नाही तर विश्वासाच्या आधारावर केली जावी. याप्रकारे मोदी यांनी चीनचे नाव न घेता जगाला सावध केले आहे. 




भारत एक असा देश आहे ज्याच्यामध्ये हे सारे गुण आहेत. भारत परदेशी गुंतवणुकदारांसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे. अमेरिकेसह आखाती देश आमच्यावर विश्वास ठेवतात. अॅमेझॉन, गुगलसारख्या कंपन्या भारतात दीर्घकालिन नितीची घोषणा करत आहेत. आमच्या देशात सामाजिक सुरक्षा आणि गरीबांसाठी संरक्षण योजनांसाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. जागतिक महामारीने प्रत्येक गोष्टीवर परिणाम केला आहे. मात्र, 130 कोटी भारतीयांच्या  आकांक्षांना प्रभावित करू शकलेली नाही. आत्मनिर्भर भारतासाठी आम्ही सज्ज झालो आहोत असेही ते म्हणाले. 




USISPF ने अमेरिका आणि भारताला खूप जवळ आणले आहे. जेव्हा 2020 ची सुरुवात झाली तेव्हा कोणीही कल्पना केली नव्हती की कोरोनासारखी महामारी येईल. हे संकट आरोग्य यंत्रणा, अर्थव्यवस्था आणि धैर्याची परीक्षा पाहत आहे. आपले लक्ष्य या यंत्रणा आणखी मजबूत बनविण्याकडे असायला हवे. जानेवारीमध्ये भारतात केवळ एकट टेस्टिंग लॅब होती आता 600 लॅब आहेत. गेल्या तीन महिन्यांत कोरोनाचेच संकट नाही तर देशावर महापूर, दोन दोन चक्रीवादळे, टोळधाडी सारखी नैसर्गिक संकटे आली. त्यांचा आम्ही कमखरपणे सामना केला आहे. सरकारने गरिबांना वाचवायचे हे लक्ष्य ठेवले होते. 80 कोटी लोकांना आज मोफत धान्य पुरविले जात आहे. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पटीहून अधिक आहे, असे मोदी म्हणाले. 



 

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा

चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी

'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला

Web Title: World trade should be about trust rather than cost; Modi's warning to the world from China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.