व्याप्त काश्मिरातील पाकचे क्रौर्य बघेल जग

By Admin | Published: October 2, 2015 11:52 PM2015-10-02T23:52:04+5:302015-10-02T23:52:04+5:30

पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) पाकिस्तानचा निर्दयीपणा दाखविणाऱ्या चित्रफितीने या देशाचे लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयचा पर्दाफाश झाला आहे

The world will see Pakistan's cruelty in the Kashmir Valley | व्याप्त काश्मिरातील पाकचे क्रौर्य बघेल जग

व्याप्त काश्मिरातील पाकचे क्रौर्य बघेल जग

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) पाकिस्तानचा निर्दयीपणा दाखविणाऱ्या चित्रफितीने या देशाचे लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयचा पर्दाफाश झाला आहे. पाकव्याप्त काश्मिरातील भीषण वास्तव आता सारे जग बघू शकेल, असे प्रतिपादन भारतातर्फे शुक्रवारी करण्यात आले.
व्हिडिओतील दृश्यांसोबत छेडछाड करण्यात आली आहे आणि भारतीय माध्यमांचा हा अपप्रचार आहे हे पाकिस्तानने केलेले दोन्हीही आरोप वरिष्ठ सरकारी सूत्रांनी फेटाळून लावले. प्रत्येक बाबतीत भारतावर आरोप थोपण्याची पाकिस्तानची खेळी सर्वश्रुत आहे आणि कॅमेरा कधी खोटे बोलत नाही, असा दावा या सूत्रांनी केला. या आठवड्याच्या प्रारंभी उघडकीस आलेल्या या व्हिडिओत पाकिस्तानी अधिकारी मुजफ्फराबाद, गिलगिट आणि कोटलीसह पीओकेतील अनेक भागात सरकारविरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांवर अत्यंत निर्दयीपणे कारवाई करताना दिसत आहेत. पाक लष्कर आणि आयएसआयने या क्षेत्रावर जो पडदा टाकून ठेवला होता तो आता उठला असून या क्षेत्रातील भीषण वास्तव जगासमोर आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया या सूत्रांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The world will see Pakistan's cruelty in the Kashmir Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.