मध्यप्रदेशात जगातील पहिले 'व्हाईट टायगर सफारी' पार्क

By Admin | Published: April 4, 2016 07:01 PM2016-04-04T19:01:53+5:302016-04-04T19:01:53+5:30

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी 'व्हाईट टायगर सफारी' पार्कचे उदघाटन केले.

The world's first white tiger safari park in Madhya Pradesh | मध्यप्रदेशात जगातील पहिले 'व्हाईट टायगर सफारी' पार्क

मध्यप्रदेशात जगातील पहिले 'व्हाईट टायगर सफारी' पार्क

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

भोपाळ, दि. ४ - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी 'व्हाईट टायगर सफारी' पार्कचे उदघाटन केले. सत्ना जिल्ह्यातील मुकूंदपूरमध्ये हे व्हाईट टायगर सफारी पार्क उभारण्यात आले आहे. फक्त सफेद वाघांसाठी सुरु करण्यात आलेले जगातील हे असे पहिले पार्क आहे. 
 
येथील विंध्य भागामध्ये १०० वर्षापूर्वी पहिला वाघ आढळला होता. या पार्कच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये खर्च आला असून, २५ हेक्टर परिसरामध्ये हे पार्क पसरले आहे. या पार्कसाठी ५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. 
 
या व्हाईट टायगर सफारी पार्कमध्ये तीन सफेद वाघ आहेत. यात एक नर आणि दोन मादी आहेत. हे पार्क आता अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये या पार्कमध्ये नऊ सफेद वाघ असतील. त्यासाठी चर्चा सुरु आहे. 

Web Title: The world's first white tiger safari park in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.