Indian Army: खतरनाक! सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात; BRO चा पराक्रम पाहून जग 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 02:43 PM2021-08-05T14:43:19+5:302021-08-05T14:44:32+5:30

World’s highest motorable road: अतिशय निमुळते पर्वत, डोंगररांगा पार करत बीआरओने 52 किमीचा हा पक्का रस्ता बनविला आहे. हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो. 

World’s highest motorable road now in India; 19,300 ft height in Ladakh; BRO constructed | Indian Army: खतरनाक! सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात; BRO चा पराक्रम पाहून जग 'कोमात'

Indian Army: खतरनाक! सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात; BRO चा पराक्रम पाहून जग 'कोमात'

googlenewsNext

सीमा रस्ते संघटनेने (BRO) अथक प्रयत्न करून जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता बांधला आहे. हा 52 किमीचा रस्ता बांधतानाच एवढा कठीण होता, की एवढ्या खडतर रस्त्यावरून वाहने चालविताना ड्रायव्हरचाही कस लागणार आहे. (World’s highest motorable road now in India; BRO completes Umlingla Pass construction)

Border Roads Organisation ही संघटना भारत सरकारची आहे. सीमाभागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम ही एजन्सी करते. बीआरओ ही भारतीय लष्कराची संघटना आहे. लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी रस्ते बनविले जातात. 
जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता बनविण्याचे रेकॉर्ड आता भारताच्या नावावर होणार आहे. पूर्व लड्डाखमध्ये उमलिंग ला पासवर 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. अतिशय निमुळते पर्वत, डोंगररांगा पार करत बीआरओने 52 किमीचा हा पक्का रस्ता बनविला आहे. हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो. 

याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हियामध्ये होता. त्याची उंची 18,953 फूट होती. हा उटुरुंकु नावाच्या ज्वालामुखीपर्यंत जात होता.  माऊंट एव्हरेस्टचे जे बेस कॅम्प आहेत ते देखील या रस्त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीवर आहेत. तिबेटमध्ये 16,900 फूट, नेपाळचा दक्षिण बेस कॅम्प 17,598 फूट उंचीवर आहे. तर माऊट एव्हरेस्टचे शिखर हे 29,000 फूट उंचीचे आहे. 

चालकांसाठी का आव्हानात्मक
उमलिंग ला पास हा प्रसिद्ध खारदुंग ला पास पेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. संरक्षण मंत्रालयानुसार येथील तापमान हे थंडीत उणे 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरते. तसेच येथील ऑक्सिजन हा 50 टक्के कमी असतो. यामुळे येथे अधिक काळ राहणे कठीण असते.

Web Title: World’s highest motorable road now in India; 19,300 ft height in Ladakh; BRO constructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.