जगातील सर्वात माेठी रिव्हर क्रुझ भारतात; पंतप्रधान करणार ‘गंगा विलास’चे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:09 PM2023-01-09T12:09:00+5:302023-01-09T12:09:08+5:30
५० दिवसांच्या प्रवासादरम्यान अनेक जागतिक वारसा स्थळांच्या ठिकाणी थांबणार आहे.
नवी दिल्ली : जगातील सर्वात माेठ्या रिव्हर क्रुझ जहाजाला पंतप्रधान नरेंद्र माेदी वाराणसी येथे शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. ‘एमव्ही गंगा विलास’ असे या क्रुझ जहाजाचे नाव आहे. नदीवरून प्रवास करणारे हे सर्वात माेठे जहाज आहे. वाराणसी ते डिब्रुगड मार्गे बांगलादेश असा क्रुझचा प्रवास राहणार आहे.
५० दिवसांच्या प्रवासादरम्यान अनेक जागतिक वारसा स्थळांच्या ठिकाणी थांबणार आहे. तसेच सुंदरबन, काझीरंगा यासारख्या काही राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यांमधूनही क्रुझ मार्गक्रमण करणार आहे.
क्रूझ आहेत या सुविधा...
जिम, स्पा, खुले डेक, वैयक्तिक बटलर सेवा इत्यादी.
- प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांमधून प्रवास
- १८ आलिशान सुट्स
- ८० प्रवाशांची क्षमता
- भारतीय व काॅन्टिनेंटल खाद्यपदार्थांची मेजवानी पर्यटकांना