जगातील सगळ्यात मोठी अवकाश दुर्बीण

By Admin | Published: July 4, 2016 06:03 AM2016-07-04T06:03:32+5:302016-07-04T06:03:32+5:30

जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण चीनने तयार केली आहे. तिच्या शेवटच्या भागाची जोडणी रविवारी झाली.

The world's largest space telescope | जगातील सगळ्यात मोठी अवकाश दुर्बीण

जगातील सगळ्यात मोठी अवकाश दुर्बीण

googlenewsNext


जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण चीनने तयार केली आहे. तिच्या शेवटच्या भागाची जोडणी रविवारी झाली. ‘फाईव्ह- हंड्रेड- मीटर अर्पेचर स्फेरिकल टेलिस्कोप-फास्ट, असे तिचे नाव आहे. गुईझोवूच्या दक्षिण-पश्चिम प्रांतातील पहाड कापून तिला जागा करण्यात आली आहे. या दुर्बिणीच्या प्रकल्पामध्ये विश्वाचा उगम कसा झाला आणि पृथ्वीच्या पलीकडील विश्वाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठीचा जो शोध आहे त्याला बळ देऊन संशोधन करण्याची क्षमता आहे, असे चायनीज अकादमी आॅफ सायन्सेसअंतर्गत असलेल्या नॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल आॅब्झर्वेशनचे उपप्रमुख झेंग शिओनियन यांनी रविवारी सांगितले. चायनीज अकादमी आॅफ सायन्सेनने दुर्बिणीची उभारणी केली आहे.
येती एक ते दोन दशके ही दुर्बीण जगाचे नेतृत्व करील, असे शिओनिअन म्हटले.
दुर्बीण तयार व्हायला पाच वर्षे लागली असून, सप्टेंबरपासून ती काम करू लागेल.30
फुटबॉलच्या मैदानांएवढा तिचा आकार आहे.180
दशलक्ष डॉलर या दुर्बिणीला खर्च
आला आहे.

Web Title: The world's largest space telescope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.