हवाईत लावणार जगातील सर्वात मोठी दुर्बिण, भारताचे योगदान
By admin | Published: May 10, 2017 01:18 AM2017-05-10T01:18:54+5:302017-05-10T01:18:54+5:30
अंतराळातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ दुर्बिणीचा वापर करतात. जगात अनेक ठिकाणी अशा दुर्बिणी आहेत
नवी दिल्ली : अंतराळातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ दुर्बिणीचा वापर करतात. जगात अनेक ठिकाणी अशा दुर्बिणी आहेत; मात्र सर्वात मोठी दुर्बिण हवाईत लावण्यात येणार आहे. या दुर्बिणीचे नाव आहे टीएमटी. टीएमटी म्हणजे थर्टी मीटर टेलिस्कोप अर्थात ३० मीटरची दुर्बिण. ही दुर्बिण २१७ फुटांच्या घुमटात बसविण्यात येणार आहे. मोठ्या दुर्बिणी ढगांहून उंच असणाऱ्या डोंगरांवर लावणे उत्तम मानले जाते. त्यामुळे ही दुर्बिण हवाईच्या माऊना की येथे लावली जाणार आहे. ही दुर्बिण सामान्य दुर्बिणींहून ३० टक्के अधिक शक्तिशाली राहणार असून, अमेरिका, चीन, भारत, कॅनडा आणि जपान संयुक्तपणे तिची निर्मिती करीत आहेत. या प्रकल्पावर आतापर्यंत १.४७ अब्ज डॉलरचा खर्च झाला आहे. यात भारताचे १० टक्के योगदान आहे. या दुर्बिणीचे अनेक महत्त्वपूर्ण भाग भारतात तयार होत आहेत. आगामी काही वर्षांत टीएमटीला आॅनलाईन आणण्याचाही विचार आहे. टीएमटीला आॅनलाईन आणण्यासाठी भारताच्या जवळपास ३०० खगोलशास्त्रज्ञांची गरज भासणार आहे.